Team India | World Cup 2011 Sakal
Cricket

World Cup 2011: वानखेडे स्टेडियम, धोनीचा विजयी षटकार, गौतमची 'गंभीर' खेळी अन् भारताचा विश्वविजय, पाहा तो सुवर्णक्षण

World Cup 2011: भारतीय संघाने 13 वर्षांपूर्वी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर विश्वविजय मिळवला होता.

Pranali Kodre

World Cup 2022, India vs Sri Lanka Final:

2 एप्रिल...ही तारीख भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी न विसरता येणारी तारीख आहे. याच दिवशी 13 वर्षांपूर्वी एमएस धोनीच्या नेतृत्वातील भारतीय संघ जगज्जेता झाला झाला.

भारतीय संघाने 2 एप्रिल 2011 रोजी वनडे वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेला पराभूत करत 28 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर विश्वविजेतेपदावर नाव कोरले होते.

आयसीसीने 10 वा वनडे वर्ल्डकप भारत, श्रीलंका आणि बांगलादेश या तीन देशात संयुक्तपणे आयोजित केला होता. या वर्ल्डकपमध्ये भारत आणि श्रीलंका यांनी अंतिम सामन्यात धडक मारली होती.

अंतिम सामना होणार होता मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर, मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या घरच्या मैदानावर. सचिनचा हा सहावा वनडे वर्ल्डकप होता आणि अखेरचाही, त्यामुळे त्याला त्याच्याच घरच्या मैदानावर वर्ल्डकप जिंकून एक अविस्मरणीय भेट भारतीय संघाने त्याला दिली होती.

असा झालेला अंतिम सामना

अंतिम सामन्यात पहिल्यांदा नाणेफेक झाली, पण त्यावेळी कर्णधारांनी दिलेला कॉल सामन्याधिकाऱ्यांना ऐकूच गेला नाही. त्यामुळे दुसऱ्यांदा नाणेफेक घेण्यात आली, यावेळी श्रीलंकेचा कर्णधार कुमार संगकाराने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी निवडली. पण झहीर खानने सलामीवीर उपुल थरंगाला 2 धावांवरच माघारी धाडले.

त्यानंतर तिलकरत्ने दिलशान आणि संगकारा डाव सांभाळत होते. परंतु, दिलशानचा अडथळा हरभजन सिंगने त्याचा 33 धावांवर त्रिफळा उडवत दूर केला. मात्र यानंतर संगकारा आणि माहेला जयवर्धने हे एकत्र आले आणि त्यांनी भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली. त्यांनी 62 धावांची भागीदारी केली.

त्यावेळी कर्णधार धोनीने युवराज सिंगच्या हातात चेंडू सोपवला आणि ही चाल कामी आली. युवीने संगकाराला 48 धावांवर माघारी धाडले. तरी जयलवर्धनेने थिलन समरविराला साथीला घेतले आणि अर्धशतकी भागीदारी केली. परंतु, समरविरालाही युवराजनेच पायचीत केले. पण तोपर्यंत श्रीलंकेने 170 धावांचा टप्पा पार केला होता.

अखेरीस जयवर्धनेला नुवाल कुलसेखरा आणि थिसरा परेरा यांनी अनुक्रमे 32 आणि 22 धावा करत साथ दिली. परेराने 9 चेंडूतच 22 धावांनी छोटेखानी पण आक्रमक खेळी केली. तसेच जयवर्धनेनेही शकत केले. त्यामुळे श्रीलंकेला 50 षटकात 6 बाद 274 धावांपर्यंत मजल मारण्यात यश मिळाले.

त्यावेळी पावणे तीनशे ही मोठी धावसंख्या समजली जात होती. भारताकडून गोलंदाजीत झहीर आणि युवराजने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या होत्या, तर हरभजनने एक विकेट घेतलेली.

दरम्यान, श्रीलंकेने दिलेल्या 275 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी भारताकडून विरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर ही जोडी मैदानात उतरली. पण डावाच्या दुसऱ्याच षटकात लसिथ मलिंगाने भारताला मोठा धक्का दिला. त्याने विरेंद्र सेहवागला भोपळाही फोडू न देता माघारी धाडले.

पाठोपाठ 7 व्या षटकात सचिनही मलिंगाविरुद्धच खेळताना 18 धावा करून यष्टीरक्षक संगकाराकडे झेल देत बाद झाला. भारताने दोन्ही अनुभवी सलामीवीरांच्या विकेट्स लवकर गमावल्या होत्या. पण नंतर गौतम गंभीरला साथ मिळाली ती युवा विराट कोहलीची.

या दोन दिल्लीकरांनी मुंबईच्या मैदानात तिसऱ्या विकेटसाठी 83 धावांची भागीदारी करत भारताच्या डावाला स्थिरता दिली. पण विराट 35 धावा करून बाद झाला.

याचवेळी भारतीय संघव्यवस्थापनाने चाल खेळेली आणि कर्णधार धोनी फलंदाजीत बढती घेत पाचव्याच क्रमांकावर फलंदाजीला उतरला. त्याने आणि गंभीरने मग श्रीलंकेच्या गोलंदाजांवर वर्चस्व ठेवले. या दोघांनीही एकमेकांना उत्तम साथ देत बघता-बघता त्यांच्यात शतकी भागीदारीही झाली. विजय काही अंतरावरच होता.

परंतु, अचानक माशी शिंकली आणि 109 धावांची भागीदारी झालेली असतानाच परेराने गंभीरला त्रिफळाचीत केले. गंभीरचं शतक अवघ्या ३ धावांनी हुकलं. गंभीर 122 चेंडूत 97 धावांवर बाद झाला. तो बाद झाला, तेव्हा भारताला 52 चेंडूत 52 धावांची गरज होती.

त्यावेळी धोनीला साथ देण्यासाठी इनफॉर्म युवाराज सिंग फलंदाजीला उतरला. त्याने आक्रमक खेळणाऱ्या धोनीला चांगली साथ दिली. धोनीनेही नंतर मोठे शॉट्स खेळले. त्यामुळे विजय भारताच्या अगदी जवळ आला होता. 11 चेंडूत भारताला अवघ्या 4 धावांनी गरज होती.

याचवेळी धोनीने नुवान कुलसेखराच्या गोलंदाजीवर हेलिकॉप्टर शॉट खेळत खणखणीत षटकार ठोकला अन् समालोचन करणाऱ्या रवी शास्त्री यांच्या तोंडून 'धोनी फिनिशेस ऑफ इन स्टाईल' हे ऐतिहासिक वाक्य ऐकू आलं.

भारतीय संघ त्यावेळी जिंकला होता. भारताचं विश्वविजयाचं स्वप्न दुसऱ्यांदा पूर्ण झालं होतं. सचिन तेंडुलकर वर्ल्ड चॅम्पियन झाला होता. त्याला आणि संघाचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टर्न यांना खांद्यावर घेत खेळाडूंनी मैदानात फेरी मारली होती.

त्या सामन्यातील भारताची गोलंदाजी, गंभीरची ती खेळी, धोनीचा षटकार, सचिनला खांद्यावर वानखेडे स्टेडियमची मारलेली फेरी, सर्वच चाहत्यांच्या मनात कायमसाठी कोरलं गेलं. या सामन्यानंतर धोनीला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. धोनीने 79 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 91 धावा केल्या होत्या, तर युवराज 21 धावांवर नाबाद राहिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT