MS Dhoni IPL 2024 Marathi News sakal
Cricket

MS Dhoni : IPL 2024 पूर्वी धोनी दिसला नव्या भूमिकेत, व्हिडिओ शेअर करून खुलासा

चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नुकतीच सोशल मीडियावर आपल्या नव्या भूमिकेबद्दल एक पोस्ट शेअर केली होती.

Kiran Mahanavar

MS Dhoni Chennai Super Kings : चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नुकतीच सोशल मीडियावर आपल्या नव्या भूमिकेबद्दल एक पोस्ट शेअर केली होती. आता त्याने आपल्या नव्या भूमिकेचा खुलासा केला आहे. आयपीएल 2024 च्या जाहिरातीच्या व्हिडिओमध्ये धोनी दिसला आहे. यात धोनी डबल रोल भूमिकेत आहे. धोनीचा व्हिडिओ शेअर केल्यानंतर काही वेळातच हजारो चाहत्यांनी त्याला लाईक केले. यावर अनेक प्रकारच्या कमेंट्सही आल्या आहेत.

खरंतर धोनीने आयपीएल 2024 साठी एक जाहिरात शूट केली आहे. यामध्ये तो अभिनय करताना दिसत आहे. धोनीने हा व्हिडिओ त्याच्या फेसबुक अकाउंटवर शेअर केला आहे. सुमारे 30 सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये धोनी डबल रोल भूमिकेत दिसत आहे. यामध्ये धोनीनेही आजोबांची भूमिका साकारली आहे.

धोनीच्या चाहत्यांनीही या व्हिडिओवर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. यापूर्वीही अनेक जाहिरात सीएसकेचा कर्णधार व्हिडिओंमध्ये दिसला आहे. धोनीपूर्वी इंडियन प्रीमियर लीगने श्रेयस अय्यर, केएल राहुल आणि ऋषभ पंत यांच्यासोबत व्हिडिओ शूट केले होते.

धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने पाच वेळा विजेतेपद पटकावले आहे. गेल्या हंगामाच्या अंतिम फेरीत त्यांनी गुजरात टायटन्सचा पराभव केला होता. 2023 चा अंतिम सामना पावसामुळे राखीव दिवशी खेळवण्यात आला. गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 214 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात चेन्नईने डकवर्थ लुईस नियमाचा वापर करून हा सामना 5 विकेटने जिंकला. चेन्नईने 15 षटकात 171 धावा केल्या होत्या. या हंगामाचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. जो 22 मार्च रोजी चेन्नई येथे रंगणार आहे.

आयपीएल 2024 साठी चेन्नई सुपर किंग्सचा संपूर्ण संघ : एमएस धोनी (कर्णधार, विकेटकीपर), मोईन अली, दीपक चहर, डेव्हॉन कॉनवे, तुषार देशपांडे, शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड, राजवर्धन हंगरकर, रवींद्र जडेजा, अजय मंडल, मुकेश चौधरी, मथिशा पाथीराना, अवनीश राव अरवेली, मिचेल, रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, शेख रशीद, मिचेल सँटनर, सिमरजीत सिंग, निशांत सिंधू, प्रशांत सोलंकी, शार्दुल ठाकूर, समीर रिझवी, मुस्तफिजुर रहमान, महेश टेकशाना.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv News: अतिवृष्टीमुळे नुकसान होऊन व कर्जबाजारीपणामुळे भूम तालुक्यातील शेतकऱ्याने संपवले जीवन

Ladki Bahin yojana: बहिणींसाठी ‘ई-केवायसी’ रुसली; ‘कनेक्टिव्हिटी’सह संकेतस्थळ वारंवार बंद होत असल्याने मनस्ताप

ठाण्यात सरकारी जागेवर ३ इमारती बांधल्या, बिल्डरकडून ११२ फ्लॅटधारकांची कोट्यवधींची फसवणूक

अरे वाह! 'या' मराठी अभिनेत्रीचा झाला साखरपुडा, नवरा सुद्धा आहे 'या' मालिकेतील अभिनेता, सोशल मीडियावर फोटोची चर्चा

Latest Marathi News Live Update : दादर प्लाझाजवळ भीषण अपघात, एकाचा मृत्यू,चार जखमी

SCROLL FOR NEXT