Ranji Trophy sakal
Cricket

Ranji Trophy : मुंबई ४८व्यांदा रणजी अंतिम फेरीत ; तमिळनाडूवर तीन दिवसांच्या आत डावाने विजय

दिमाखदार कामगिरीचा अश्वमेध चौखूर उधळणाऱ्या मुंबईने तमिळनाडूचा एक डाव आणि ७० धावांनी पराभव केला. तीन दिवसांच्या आतच उपांत्य फेरीचा सामना जिंकला आणि ४८व्यांदा रणजी अंतिम सामन्यात धडक मारली.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : दिमाखदार कामगिरीचा अश्वमेध चौखूर उधळणाऱ्या मुंबईने तमिळनाडूचा एक डाव आणि ७० धावांनी पराभव केला. तीन दिवसांच्या आतच उपांत्य फेरीचा सामना जिंकला आणि ४८व्यांदा रणजी अंतिम सामन्यात धडक मारली.

तनूषचे शतक अपूर्ण

बडोद्याविरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्यात दहाव्या क्रमांकावर फलंदाजी करत शतक करणाऱ्या तनुष कोटियनने आजही शतकाकडे झेप घेतली होती; परंतु त्याचा अखेरचा साथीदार तुषार देशपांडे बाद झाल्यामुळे तनुषला नाबाद ८९ धावांवर परतावे लागले. बडोद्याविरुद्धच्या या सामन्यात तुषारनेही शतक केले होते.

अंतिम सामना वानखेडेवर.

मुंबई संघाने अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे. दुसरा उपांत्य सामना विदर्भ आणि मध्य प्रदेश यांच्यात सुरू आहे. यातील कोणताही संघ अंतिम फेरीत दाखल झाला तरी विजेतेपदाचा सामना मुंबईत वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.

आता दोन दिवसांची अतिरिक्त विश्रांती

सात बाद १०६ या अवस्थेनंतर ३७८ धावा उभारून २३२ धावांची भलीमोठी आघाडी घेणाऱ्या मुंबईने तमिळनाडूचा दुसरा डाव १६२ धावांत ५१.५ षटकांत गुंडाळला, त्यामुळे सामना तिसऱ्याच दिवशीच संपला आणि मुंबई संघाला अंतिम सामन्याअगोदर दोन दिवसांची अतिरिक्त विश्रांती मिळाली. अंतिम सामना १० मार्चपासून सुरू होणार आहे.

शार्दुल ठाकूर सर्वोत्तम

सध्या भारतीय संघातून दूर असलेला शार्दुल ठाकूर आपल्या अष्टपैलू कामगिरीमुळे या सामन्यात सर्वोत्तम खेळाडू ठरला. काल त्याने १०५ चेंडूत १०९ धावांची खेळी साकार केली होती. आज तमिळनाडूचा डाव सुरू झाल्यावर त्यांचे सलामीवीर संघाच्या खेळाडूंना सहा धावांतच बाद केले. शार्दुलने उघडून दिलेल्या या दरवाजावर मोहित अवस्थी (२६ धावांत २), शम्स मुलानी (५३ धावांत ४) आणि तनुष कोटियन (१८ धावांत २) यांनी विजयाच्या पताका लावल्या.

तमिळनाडूची दुसऱ्या डावात तीन बाद १० अशी अवस्था झाली. त्यात बाद झालेल्या फलंदाजांमध्ये वॉशिंग्टन सुंदरचा समावेश होता. पहिल्या डावातही तमिळनाडूचा डाव सहा बाद ९० अशी दारुण परिस्थितीत सापडलेला असताना याच वॉशिंग्टनने ४३ धावांची खेळी केली होती. त्यामुळे आज वॉशिंग्टन बाद झाल्यानंतर मुंबईच्या विजयाची औपचारिकताच शिल्लक होती. मात्र, बाबा इंद्रजित (७०) विजय शंकर (२४) यांचा प्रतिकार तनुष कोटियन आणि मोहित अवस्थी यांनी मोडून काढल्यावर तमिळनाडूचा पराभव निश्चित झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT