Hardik Pandya and Natasa Stankovic  sakal
Cricket

Hardik Pandya-Natasa Stankovic : पांड्यासोबत घटस्फोटाच्या चर्चां अन् नताशाची पुन्हा एकदा रहस्यमय पोस्ट! सोशल मीडियावर व्हायरल

Hardik Pandya and Natasa Stankovic divorce rumours: गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविच यांच्या घटस्फोटाच्या अफवा पसरत आहेत.

Kiran Mahanavar

Hardik Pandya and Natasa Stankovic divorce : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविच यांच्या घटस्फोटाच्या अफवा पसरत आहेत. मात्र, या संदर्भात अद्याप दोन्ही बाजूंनी कोणतेही वक्तव्य आलेले नाही. पण काही दिवसांपूर्वी नताशाने क्रुणाल पांड्याच्या सोशल मीडिया पोस्टवर सकारात्मक प्रतिक्रिया दिली होती आणि ती अजूनही पांड्या कुटुंबाशी जोडलेली असल्याचे संकेत दिले होते.

दरम्यान, नताशाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर आणखी एक रहस्यमय स्टोरी शेअर केली आहे, ज्यामध्ये नताशा एका गाडीतून रोडवरून जात आहे. आणि तिने काही इमोजीसह लिहिले की, देवाची प्रार्थना करा.

हार्दिक आणि नताशाने २०२० मध्ये लग्न केले होते. मात्र, त्यावेळी दोघांनाही कोविडमुळे एकदम साध्या पद्धतीने लग्न केले होते. म्हणूनच हार्दिक-नताशाने गेल्या वर्षी उदयपूरमध्ये त्यांच्या लग्नाचा भव्य सोहळा साजरा केला, ज्यामध्ये क्रिकेट जगतातील अनेक दिग्गज आणि बॉलिवूड सेलिब्रिटींनीही सहभाग घेतला होता. या जोडप्याला अगत्स्य नावाचा तीन वर्षांचा मुलगाही आहे.

पण सोशल मीडियावर पसरलेल्या बातम्यांमध्ये असेही म्हटले गेले आहे की, जर हार्दिकने नताशाला घटस्फोट दिला तर त्याला त्याच्या संपत्तीतील 70 टक्के रक्कम पत्नीला द्यावी लागेल. मात्र, हार्दिक आणि नताशा यांनी आतापर्यंत या अफवांवर मौन बाळगले आहे.

क्रिकेटबद्दल बोलायचे झाले तर, हार्दिक न्यू यॉर्कमध्ये टीम इंडियाच्या संघात सामील झालेला आहे. हार्दिकची अलीकडची कामगिरी काही काळापासून खराब राहिली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला आयपीएल 2024 मध्ये प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडावे लागले. त्याचबरोबर फलंदाजी आणि गोलंदाजीमध्येही हार्दिकची कामगिरी विशेष नव्हती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway News: प्रदूषणाला रेल्वेचं जोरदार उत्तर! आता पैसा अन् वेळही वाचणार; भारतीय रेल्वेची नवी वाहतूक क्रांती सुरू, योजना काय?

Pune Court Decision: पतीला जीव देण्यास प्रवृत्त केलं, पत्नीला सात वर्षांची सक्तमजुरी! दुसरा विवाह अन्...

Latest Marathi Breaking News Live Update: शिवसेना ठाकरे पक्षाचे एबी फॉर्म चोरीला - अनिल देसाई

Akola News : सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे खाजगीकरण करण्याचा डाव; आ. साजिद खान यांचा स्फोटक आरोप

Leopard Attack : दोन बिबट्यांचा मेंढ्यांच्या कळपावर हल्ला; जीव धोक्यात घालून मेंढपाळ महिलेने केला प्रतिकार

SCROLL FOR NEXT