Nathan Lyon
Nathan Lyon esakal
क्रिकेट

NZ vs AUS Nathan Lyon : एकही अर्धशतक नाही तरी 'नाईट वॉचमन' नॅथन लायननं केला भन्नाट विक्रम

अनिरुद्ध संकपाळ

NZ vs AUS Nathan Lyon : न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना वेलिंग्टन येते होत आहे. या सामन्यात दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायनने फलंदाजीत एक अनोखा विक्रम केला. दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे फलंदाज स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशेन बाद झाल्यावर नॅथन लायन नाईट वॉचमन म्हणून फलंदाजी करण्यासाठी आला.

त्याने आपल्या या खेळीत 46 चेंडूत 41 धावा ठोकल्या. यात सहा चौकारांचा समावेश होता. त्याने 89 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. या खेळीद्वारे त्याने कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजीतला एक अनोखा विक्रम केला. नॅथन लायनने 128 कसोटी सामन्यातील 162 डावात 1501 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 12.72 इतकी आहे. त्याची सर्वोच्च धावसंख्या ही 47 आहे.

नॅथन लायन आता कसोटीत एकही अर्धशतक न करता सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. या यादीत त्याच्यानंतर वेस्ट इंडीजचा केमार रोच आहे. त्याने 81 कसोटीत 1174 धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या ही 41 इतकी आहे. तिसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज वकार युनिसचा नंबर लागतो. त्याने 87 कसोटीत 1010 धावा केल्या असून त्याची सर्वोच्च धावसंख्या 45 धावा केल्या. (Cricket Latest Marathi News)

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर ऑस्ट्रेलियाने यजमान न्यूझीलंडसमोर विजयासाठी 369 धावांचे आव्हान ठेवले आहे. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने 368 धावांची आघाडी घेतली होती. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 164 धावात संपुष्टात आला होता. लायनच्या सर्वोच्च 41 धावांव्यतिरिक्त कॅमरून ग्रीनने 34 आणि ट्रॅविस हेडने 29 धावा केल्या. सलामीवीर उस्मान ख्वाजाने 28 धावा केल्या आहेत.

न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्सने 45 धावात 5 विकेट्स घेतल्या. तर मॅट हेन्रीने 36 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. टीम साऊदीने 2 विकेट्स घेत त्यांना उत्तम साथ दिली.

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 204 धावांची आघाडी घेतली होती. पहिल्या डावात कांगारूंनी 363 धावा केल्या होत्या. त्यानंतर किवींना 179 धावात गुंडाळले होते. न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्सने झुंजार खेळी करत 70 चेंडूत 71 धवा केल्या. तर मॅट हेन्रीने 42 धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायनने 43 धावात 4 विकेट्स घेतल्या होत्या.

(Cricket Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: CM शिंदेंनी पाठवली संजय राऊतांना कायदेशीर नोटीस; राऊत म्हणतात, इंटरेस्टिंग...

T20 World Cup 2024 : भारत-पाक T20 सामना होणारं जगातलं पहिलं मॉड्युलर स्टेडियम कसं आहे?

T20 World Cup 2024 : रोहित शर्माचा पत्ता कट... 'ही' जोडी करणार ओपनिंग? वर्ल्ड कपपूर्वी भारतीय दिग्गजाचं मोठं वक्तव्य

Jitendra Awhad: ''स्टंटबाजी करताना जितेंद्र आव्हाडांनी बाबासाहेबांचा फोटो फाडला''; अजित पवार गट आक्रमक

World Record : रेकॉर्ड ब्रेक कामगिरी! एव्हरेस्टवर जलद चढाईचा विक्रम नेपाळच्या महिलेने मोडला, अवघ्या १५ तासात पोहोचली शिखरावर

SCROLL FOR NEXT