Nepal Dipendra Singh six sixes in an over Marathi News
Nepal Dipendra Singh six sixes in an over Marathi News sakal
क्रिकेट

Video : 6,6,6,6,6,6 आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये पठ्ठ्याने उडून दिली खळबळ, ठोकले 6 बॉलमध्ये 6 षटकार अन्...

Kiran Mahanavar

Six sixes in an over Nepal Dipendra Singh : 2024 हे वर्ष टी-20 क्रिकेटसाठी खूप खास असणार आहे. कारण यावर्षी वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत टी-20 वर्ल्ड कप खेळला जाणार आहे. अशा परिस्थितीत सर्व संघ टी-20 क्रिकेटवर विशेष लक्ष केंद्रित करत आहेत.

दरम्यान, नेपाळच्या एका खेळाडूने टी-20 इंटरनॅशनलमध्ये युवराज सिंगसारखी कामगिरी केली आहे. या खेळाडूने एका षटकात 6 चेंडूत 6 षटकार मारून इतिहास रचला आहे. हा खेळाडू दुसरा कोणी नसून नेपाळचा स्टार फलंदाज दीपेंद्र सिंग ऐरी आहे.

दीपेंद्र सिंग ऐरीने शनिवारी कतारविरुद्धच्या टी-20 सामन्यात एका षटकात सहा षटकार ठोकले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका षटकात सहा षटकार मारणारा ऐरी हा पहिला नेपाळचा क्रिकेटपटू ठरला.

नेपाळच्या 24 वर्षीय उजव्या हाताचा फलंदाज दीपेंद्र सिंगने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका षटकात सलग सहा षटकार मारण्याचा विक्रम केला आहे. याआधी क्रिकेटपटू युवराज सिंग आणि किरॉन पोलार्ड यांना हा कारनामा केला होता.

ओमान क्रिकेटमधील अल अमिराती क्रिकेट मैदानावर त्याने शेवटच्या षटकात कामरान खानच्या चेंडूवर सहा षटकार मारून 21 चेंडूत नाबाद 64* धावा केल्या. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सहा षटकार मारणारा युवराज पहिला क्रिकेटर होता, त्याने 2007 टी-20 वर्ल्ड कप़ स्पर्धेत इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात 6 षटकार मारले होते.

तर किरॉन पोलार्डने 2021 मध्ये कूलिज येथे झालेल्या टी-20 सामन्यात श्रीलंकेच्या अकिला धनंजयाला सहा षटकार मारून युवराजच्या विक्रमाची बरोबरी केली होती.

दीपेंद्र सिंग ऐरीने गेल्या वर्षी हँगझोऊ येथे खेळल्या गेलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत युवराज सिंगचा आणखी एक मोठा विक्रम मोडला. त्याने मंगोलियाविरुद्ध 9 चेंडूत अर्धशतक केले, हे टी-20 क्रिकेटमधील सर्वात वेगवान अर्धशतक आहे. त्याने 2007 मध्ये युवराज सिंगने केलेला विक्रम मोडला. ज्या सामन्यात युवराजने 6 चेंडूत 6 षटकार मारले होते, त्या सामन्यात त्याने 12 चेंडूत अर्धशतक झळकावले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: "केजरीवालांना स्वतंत्र कोठडी अन् साधा कूलरही नाही"; आतिषी यांचा राज्यपालांवर हल्लाबोल

Uddhav Thackeray: फडणवीसांच्या जवळच्या व्यक्तीनं उद्धव ठाकरेंकडं भेटीसाठी मागितली वेळ?; निकालापूर्वीच मोठी घडामोड

Pune Lok Sabha Election Results : कोरेगाव पार्क परिसरात उद्या वाहतुकीत बदल; कोणते आहेत पर्यायी मार्ग, जाणून घ्या..

Hardik Pandya Natasa Stankovic : ट्रोलिंगवर सहानभुतीचा उतारा.. हार्दिकनं मुद्दाम पसरवली घटस्फोटाची अफवा?

Uddhav Thackeray: ...तर ते CCTV फुटेज बाहेर काढावे लागेल, उद्धव ठाकरेंवरील आरोपाने राजकारण ढवळून निघणार

SCROLL FOR NEXT