Cricket

टी-20 World Cupच्या रंगीत तालमीसाठी पाकिस्तान सज्ज! संघाची केली घोषणा, दोन पठ्ठ्यांची ताफ्यात एन्ट्री

Pakistan squad for Ireland and England Series : टी-20 वर्ल्ड कप 2024 चा थरार जून महिन्यात रंगणार आहे. त्यासाठी सर्व संघ आपापली टीमची घोषणा करत आहेत.

Kiran Mahanavar

Pakistan squad for Ireland and England Series : टी-20 वर्ल्ड कप 2024 चा थरार जून महिन्यात रंगणार आहे. त्यासाठी सर्व संघ आपापली टीमची घोषणा करत आहेत. बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. पाकिस्तानने टी-20 वर्ल्ड कपसाठी आपल्या संघाचे नाव जाहीर केले नसले तरी आयर्लंड आणि इंग्लंड मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. संघात 18 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड अर्थात PCB ने गुरुवारी टी-20 वर्ल्ड कप 2024 पूर्वी इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यासाठी संघाच्या 18 सदस्यीय संघाची घोषणा केली. या संघाचा कर्णधार बाबर आझम राहणार आहे. त्यांच्याशिवाय अबरार अहमद, आझम खान, हारिस रौफ, सलमान अली आगा, मोहम्मद इरफान खान, उस्मान खान, शाहीन आफ्रिदी यांचा समावेश करण्यात आला आहे.

पाकिस्तान संघ 10 मे ते 14 मे दरम्यान आयर्लंडविरुद्ध टी-20 मालिका खेळणार आहे. यानंतर, संघ 22 मे पासून इंग्लंड दौऱ्यावर जाईल, जिथे चार टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळवले जातील. ही मालिका टी-20 वर्ल्ड कप 2024 ची रंगीत तालमी आहे असे मानले जात आहे.

आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी पाकिस्तानचा T20I संघ : बाबर आझम (कर्णधार), अबरार अहमद, आझम खान, फखर जमान, हारिस रौफ, हसन अली, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, अब्बास आफ्रिदी, मोहम्मद अमीर, मोहम्मद रिझवान, इरफान खान नियाज, नसीम शाह, सैम अय्युब, सलमान अली आगा, शादाब खान, शाहीन आफ्रिदी, उस्मान खान.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: नीरज चोप्राचे 'सुवर्ण' हुकले, Rumesh Pathirage ने मारली बाजी; पाकड्या अर्शद नदीमची लाज गेली, वाचा काय झालं...

TEJASWIN SHANKAR HISTORICAL MEDAL: तेजस्विन शंकरने इतिहास घडवला! खडतर अशा डेकॅथलॉन स्पर्धेत भारताला जिंकून दिले पहिले पदक

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

SCROLL FOR NEXT