Shoaib akhtar welcome daughter nooreh ali Marathi News sakal
Cricket

Shoaib Akhtar : वयाच्या 48 व्या वर्षी पाकिस्तानी दिग्गज खेळाडू शोएब अख्तर तिसऱ्यांदा झाला बाप! पाहा Photo

Shoaib akhtar welcome daughter nooreh ali : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि वेगवान गोलंदाज शोएब अख्तर शुक्रवारी तिसऱ्यांदा बाबा झाला.

Kiran Mahanavar

Shoaib Akhtar News : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि वेगवान गोलंदाज शोएब अख्तर शुक्रवारी तिसऱ्यांदा बाबा झाला. त्याने स्वतः त्याच्या इंस्टाग्रामवर फोटो शेअर करून ही माहिती दिली आहे. शोएबला आधीच दोन मुले मोहम्मद मिकाइल अली आणि मोहम्मद मुजद्दाद अली आहेत. आता त्याला एक सुंदर मुलगी झाली आहे.

रावळपिंडी एक्सप्रेस म्हणून प्रसिद्ध असलेल्या शोएब अख्तरने आपल्या मुलीचे नाव नूरह अली ठेवले आहे. शोएबच्या पत्नीचे नाव रुबाब खान आहे आणि जी त्याच्यापेक्षा 18 वर्षांनी लहान आहे. शोएब अख्तरने त्याच्या इंस्टाग्रामवर ही माहिती शेअर करताच नेटकऱ्यांनी त्याचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली.

शुक्रवारी शोएबने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. ज्यामध्ये तो मुलीला मांडीवर घेतलेला दिसत आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले, मिकाईल आणि मुजद्दीद यांना आता एक लहान बहीण आहे. अल्लाहने आम्हाला मुलगी दिली आहे. 1 मार्च 2024, 19 शाबान, 1445 हिजरी रोजी जुम्माच्या नमाजच्या वेळी जन्मलेल्या नूरह अली अख्तरचे स्वागत.

शोएब अख्तरने 2014 मध्ये रुबाब खानसोबत हरिपूर येथे कुटुंबीयांच्या उपस्थितीत विवाह केला होता. त्यावेळी अख्तरच्या लग्नाची खूप चर्चा झाली कारण त्याची पत्नी 20 वर्षांची होती आणि माजी पाकिस्तानी गोलंदाज 38 वर्षांचा होता.

48 वर्षीय अख्तरने 2011 वर्ल्ड कप संपल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता. सध्या अख्तर त्याच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून क्रिकेटशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपले मत मांडताना दिसत आहे. याशिवाय त्याने क्रिकेट समालोचक म्हणून आपली दुसरी इनिंगही खूप आधी सुरू केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT