Cricket

IRE vs PAK: बाबर आझम शुन्यावर आऊट झाला, पण T20I नेतृत्वात पहिला क्रमांक पटकावला; धोनी-रोहितलाही पछाडलं

Captain Babar Azam T20I Record: पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये एक मोठ्या विश्वविक्रमाला गवसणी घालताना एमएस धोनी, रोहित शर्मा, ओएन मॉर्गन अशा दिग्गजांनाही मागे टाकले आहे.

Pranali Kodre

Captain Babar Azam T20I Record: पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या युरोप दौऱ्यावर असून आयर्लंडविरुद्ध तीन सामन्यांची टी20 मालिका खेळत आहे. या मालिकेतील दुसरा सामना रविवारी (12 मे) डब्लिनला झाला. या सामन्यात पाकिस्तानने 7 विकेट्सने विजय मिळवत मालिकेत बरोबरी साधली आहे.

याबरोबरच हा विजय पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमसाठीही विश्वविक्रमी ठरला आहे. त्याच्या नेतृत्वात हा विजय पाकिस्तानने मिळवला असल्याने आता तो आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे.

त्याच्या नेतृत्वात पाकिस्तानने मिळवलेला हा 45 वा विजय ठरला आहे. आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये एकाच कर्णधाराच्या नेतृत्वात जिंकलेले हे सर्वाधिक सामने आहेत. त्यामुळे बाबर आझमने सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी20 सामने जिंकणाऱ्या कर्णधारांच्या यादीत एमएस धोनी, रोहित शर्मा, ओएन मॉर्गन अशा दिग्गजांनाही मागे टाकले आहे.

या सामन्यापूर्वी बाबर आझम आणि ब्रायन मसाबा हे 44 विजयांसह संयुक्तरित्या अव्वल क्रमांकावर होते. परंतु, आता बाबरने पहिला क्रमांक पटकावला आहे.

आंततरराष्ट्रीय पुरुष टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजय मिळवणारे कर्णधार

  • 45 विजय - बाबर आझम (78 सामने)

  • 44 विजय - ब्रायन मसाबा (56 सामने)

  • 42 विजय - असगर अफगाण (52 सामने)

  • 42 विजय - ओएन मॉर्गन (72 सामने)

  • 41 विजय - रोहित शर्मा (54 सामने)

  • 41 विजय - एमएस धोनी (72 सामने)

पाकिस्तानचा विजय

रविवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आयर्लंड संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला होता. आयर्लंडने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 193 धावा केल्या होत्या.

आयर्लंडकडून यष्टीरक्षक फलंदाज लॉर्कन टकरने सर्वाधिक 51 धावांची खेळी केली. तसेच हॅरी टेक्टरने 32 धावांची खेळी केली. पाकिस्तानकडून गोलंदाजीत शाहिन आफ्रिदीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर पाकिस्तानने 194 धावांचे लक्ष्य 16.5 षटकात 195 धावा करत पूर्ण केले. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवानने आक्रमक खेळताना 46 चेंडूत नाबाद 75 धावा केल्या आणि फखर जमाने 40 चेंडूत 78 धावांची खेळी केली. मात्र कर्णधार बाबर आझम या सामन्यात शुन्यावरच बाद झाला.

आयर्लंडकडून गोलंदाजीत मार्क एडेर, ग्रॅहम ह्युम आणि बेंजामिन व्हाईट यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दरम्यान, या मालिकेतील पहिला सामना आयर्लंडने जिंकला होता. तसेच आता दुसरा सामना पाकिस्तानने जिंकला. त्यामुळे आता 14 मे रोजी होणारा सामना निर्णायक ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांना मोठा धक्का! 'या' बड्या नेत्याने राजीनामा हाती सोपवला; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याची शक्यता

Raigad Heavy Rain: रायगड जिल्ह्यात सोमवारी शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Maharashtra Monsoon: मुंबईसह कोकण जलमय! रायगडात पूरसदृश परिस्थिती; महामार्ग, द्रुतगती मार्गावर वाहतुकीचा खोळंबा

Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पावसाचा तडाखा! शिवसेना नेत्याच्या कार्यालयावर भलंमोठं झाड कोसळलं; झाडांचा प्रश्न ऐरणीवर

T20 World Cup 2026 Final: एलिस पेरीची विश्वविक्रमाशी बरोबरी, तर ऑस्ट्रेलियन क्षेत्ररक्षकांचे अफलातून कॅच; पण तरी इंग्लंड दीडशे पार

SCROLL FOR NEXT