India vs Pakistan | T20 World Cup 2024 X/TheRealPCB
Cricket

YouTuber shot dead: धक्कादायक! भारत-पाकिस्तान सामन्यावर व्हिडिओ बनवणाऱ्या युट्युबरवर सिक्युरिटी गार्डने झाडली गोळी

India vs Pakistan: पाकिस्तानमधील युट्युबर भारत-पाकिस्तान सामन्यावर व्हिडिओ करत असताना त्याच्यावर सिक्युरिटी गार्डने गोळी झाडल्याची माहिती समोर येत आहे.

Pranali Kodre

Pakistani YouTuber shot dead: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत रविवारी (9 जून) पाकिस्तानला भारताविरुद्ध पराभवाचा धक्का बसला. न्युयॉर्कमध्ये झालेल्या या सामन्यात भारताने पाकिस्तानला 6 धावांनी पराभूत केले.

हा पाकिस्तानचा या स्पर्धेतील सलग दुसरा पराभव होता, त्यामुळे त्यांचे चाहते निराश झाले होते. त्यातच आता सर्वांना धक्का देणारी बातमी समोर आली आहे.

या सामन्यानंतर पाकिस्तानमधील कराची येथे एका युट्युबरचा एका सिक्युरिटी गार्डने गोळी झाडल्याने जीव गेला असल्याचे समोर आले आहे.

पाकिस्तानमधील मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार साद अहमद नावाचा युट्युबर कराचीमधील मोबाईल मार्केटमध्ये गेला होता आणि तो अनेक दुकानदरांची मतं सामन्याबद्दल जाणून घेत होता. त्याने सिक्युरीटी गार्डचेही मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण तो सिक्युरिटी गार्डने याद कोणताही रस दाखवला नाही.

साद त्याच्यासमोर मायक्रोन धरून शूट करण्याचा प्रयत्न करत असताना चिडून त्याने 24 वर्षीय सादला गोळी झाडली. यानंतर सादला लगेचच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, परंतु त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

जियो टीव्हीने दिलेल्या एका वृत्तानुसार सादच्या एका मित्राने सांगितले की त्याच्या कुटुंबातील तो एकमेव कमावता व्यक्ती होता. त्याचे लग्न झालेले होते आणि त्याला २ मुलेही आहेत. दरम्यान, या घटनेनंतर कराचीमध्ये खळबळ उडाली आहे.

दरम्यान, सिक्युरिटी गार्डला पोलिसांनी ताब्यात घेतले असून प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर भारताने प्रथम फलंदाजी करताना 19 षटकात सर्वबाद 119 धावा केल्या होत्या. त्यानंतर पाकिस्तानला 20 षटकात 7 बाद 113 धावाच करता आल्या. त्यामुळे भारताने हा सामना जिंकला. या सामन्यातील पराभवामुळे पाकिस्तानसाठी पुढील वाटचाल कठीण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे महापालिका प्रभाग आरक्षणाची सोडत मंगळवारी

शूटिंगवरून परतल्यावर रोजची भेट! अभिनेत्री जुई गडकरीचा स्ट्रीट डॉग्स सोबतचा हृदयस्पर्शी प्रवास

Buldhana Crime : मध्य प्रदेश मधील अग्नी शस्त्र निर्मिती; गृह खात्यासाठी ठरतेय डोकेदुखी

Junnar Leopard's : जुन्नर तालुक्यात वाढत्या बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे नागरिकांचे जीवनाधिकार धोक्यात; वन विभागाला तातडीची नोटीस!

Pune News : झेडपीच्या ४६ शिक्षकांवर होणार कारवाई; दिव्यांगत्वाचे प्रमाण हे ४० टक्क्यांहून कमी

SCROLL FOR NEXT