Rahul Dravid T20 World Cup  salal
Cricket

Rahul Dravid: राहुल द्रविडला मानलं! BCCIची 'ही' पैशांची खास ऑफर चक्क नाकारली, काय घडलं नेमकं?

Team India Head Coach: टीम इंडियाला 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये चॅम्पियन बनवणाऱ्या मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचा कार्यकाळ आता संपला आहे.

Kiran Mahanavar

Rahul Dravid: टीम इंडियाला 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये चॅम्पियन बनवणाऱ्या मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचा कार्यकाळ आता संपला आहे. त्यानंतर आता गौतम गंभीरने मुख्य प्रशिक्षकपद स्वीकारले आहे. संघाला चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या राहुल द्रविडला बीसीसीआयला विशेष बक्षीस द्यायचे होते, मात्र द्रविडने त्याच्या उर्वरित सहकाऱ्यांसाठी बीसीसीआयची ही ऑफर नाकारली आहे.

द्रविडने नाकारली बीसीसीआयची ऑफर

टी-20 वर्ल्ड कप 2024 चे विजेतेपद जिंकून टीम इंडिया भारतात परतली तेव्हा बीसीसीआयने वानखेडे स्टेडियमवर सर्व खेळाडूंचा सन्मान केला. यावेळी बीसीसीआयने संपूर्ण संघ आणि कोचिंग स्टाफला 125 कोटी रुपयांचा धनादेशही दिला होता.

या 125 कोटी रुपयांपैकी प्रशिक्षक राहुल द्रविडसह संघातील खेळाडूंना 5 कोटी रुपये मिळणार होते, तर उर्वरित गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप आणि फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांना प्रत्येकी 2.5 कोटी रुपये मिळणार होते.

पण बीसीसीआयची पाच कोटींची ऑफर राहुलने नाकारली आहे. हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, राहुल द्रविडलाही इतर प्रशिक्षकांप्रमाणेच रक्कम घेत आहे आणि बीसीसीआय त्यांच्या निर्णयाचा आदर करते.

राहुल द्रविडच्या प्रशिक्षणाखाली आणि रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला पहिल्यांदाच वर्ल्ड कप जिंकता आला. यापूर्वी, राहुलच्या कोचिंगमध्ये टीम इंडियाने 2023 च्या एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती, परंतु अंतिम सामन्यात संघ ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Crime News : सांगलीतून बाळाला उचललं अन् चिपळूणमध्ये एक लाख ८० हजारांना सौदा, पण माय लेकाच दोरी घट्ट होती...

Nagpur Farmer: ५६ हजारांवर शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षाच; अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान, दिवाळीनंतरही मदतीपासून वंचित

Latest Marathi News Live Update : अखेर बंजारा आंदोलक विजय चव्हाण यांचे आमरण उपोषण मागे

कबाली हत्तीनं अडवला रस्ता, १८ तास वाहतूक ठप्प; वाहनांच्या रांगा, VIDEO VIRAL

AUS vs IND: जरा इकडे ये ऐक... विराट कोहलीने कॅप्टन शुभमन गिलला हात धरून मागे खेचलं अन् मग...; Video Viral

SCROLL FOR NEXT