rajat patidar Ind vs Eng Marathi News sakal
Cricket

Ind vs Eng : 5 डावात फक्त 63 धावा... टीम इंडियाच्या 'या' खेळाडूवर टांगती तलवार, धरमशाला कसोटीत पत्ता कट?

Rajat Patidar England Vs India :

Kiran Mahanavar

India vs England Test : सध्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत विराट कोहलीच्या जागी रजत पाटीदारचा टीम इंडियात समावेश करण्यात आला होता. त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या, आणि टीम इंडियाच्या व्यवस्थापनानेही त्याच्यावर विश्वास व्यक्त केला होता. त्याला कोहलीच्या आवडत्या फलंदाजीच्या स्थानावर म्हणजेच चौथ्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळाली.

आत्तापर्यंत त्याने 5 डाव खेळले आहेत. मात्र या मालिकेत त्याची कामगिरी काय चांगली राहिली नाही. अशा परिस्थितीत त्याला धरमशाला कसोटीत स्थान मिळणार का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

पाटीदारने आतापर्यंत 5 सामन्यात केवळ 63 धावा केल्या आहेत. या काळात त्याची सरासरी 12.6 आहे. पाटीदारची ही कामगिरी त्याच्या देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरीच्या जवळपासही नाही. पाटीदारने 57 प्रथम श्रेणी सामन्यांच्या 97 डावांमध्ये 44.46 च्या सरासरीने 4046 धावा केल्या आहेत. अशा परिस्थितीत त्याचा सध्याचा फॉर्म अतिशय चिंताजनक आहे.

टीम इंडियाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठौर यांनी रांची कसोटी सुरू होण्यापूर्वी रजत पाटीदारला पाठिंबा दिला होता. रजत पाटीदार सतत बोलत असल्याचे विक्रम राठोड म्हणाले होते.

यादरम्यान राठोड यांनी ठणकावून सांगितले होते की, केवळ दोन खराब सामन्यांच्या जोरावर खेळाडू बाहेर जात नाही, हे कुणासोबतही होऊ शकते. अशा स्थितीत एक गोष्ट स्पष्ट होते की, सध्या टीम इंडियाचे व्यवस्थापन पाटीदारांच्या पाठीशी असल्याचे दिसते.

मात्र, टीम इंडियाच्या व्यवस्थापनाचा हा निर्णय योग्यही मानला जाऊ शकतो. कारण नुकतेच शुभमन गिलच्या बाबतीतही असेच घडले आहे, तो सातत्याने कसोटी क्रिकेटमध्ये खराब कामगिरी करत होता. यानंतरही त्याला संघात ठेवण्यात आले. त्याने 4 फेब्रुवारीला विझाग (विशाखापट्टणम) येथे 332 दिवसांनंतर कसोटी शतक झळकावले. गिलचे शेवटचे शतक 9 मार्च 2023 रोजी अहमदाबाद येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध आले होते. त्या शतकानंतर गिलला 12 डावांत अर्धशतकही करता आले नव्हते.

विझागमधील पदार्पणाच्या सामन्याच्या पहिल्या डावात पाटीदारने 32 धावांची खेळी खेळली, त्यादरम्यान त्याने 78 चेंडूंचा सामना केला. त्यानंतर त्याला एकही मोठी खेळी करता आली नाही. यानंतर पाटीदार 9 (विझाग), 5 आणि 0 (राजकोट कसोटी), 17 (रांची कसोटी) धावांवर बाद झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Live: इशान किशन बरसला, हेनरिच क्लासनही जबरदस्त खेळला; पण, राजस्थानच्या गोलंदाजांचे पुनरागमन, नितीश रेड्डी भिडला

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

MPSC Success Story: पहुरजिऱ्याचा अजय दिघडेचा पराक्रम; MPSC उत्तीर्ण होऊन असिस्टंट कमिशनर पदावर झेप, आई-वडिलांच्या कष्टांना यशाची किनार..

SRH vs RR Live: इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले! पण, जिंकली Orange Cap; झेल घेताना दोन खेळाडू एकमेकांना आपटले

Gadchiroli Health: कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू; आशा वर्करची टाळाटाळी, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता अन्..

SCROLL FOR NEXT