rajat patidar  sakal
Cricket

Rajat Patidar IND vs ENG : रजत पाटीदार कसोटी कारकीर्द वाचवू शकतो फक्त... अनिल कुंबळेंनी दिला मोलाचा सल्ला?

अनिरुद्ध संकपाळ

Rajat Patidar IND vs ENG : भारताचा मधल्या फळातील फलंदाज रजत पाटीदारला इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेत फारशी चमक दाखवता आलेली नाही. विराट कोहली, केएल राहुल आणि श्रेयस अय्यर संघात नसताना या युवा खेळाडूंना संधी देण्यात आली. रजत पाटीदार, सर्फराज खान आणि ध्रुव जुरेल पदार्पण केले.

मात्र सर्फराज आणि ध्रुव सोडला तर रजत पाटीदारला आपले पदार्पण यशस्वी करता आले नाही. त्याने 6 डावात फक्त 63 धावा केल्या. जर केएल राहुल संघात परतला तर रजत पाटीदारची गच्छंती होणार आहे. यामुळे रजत पाटीदारची कसोटी कारकीर्द ही संपुष्टात आली आहे असं बोललं जात आहे.

मात्र भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळेने चौथ्या दिवशीच्या लंचमध्ये जिओ सिनेमावर बोलताना सांगितले की रजत पाटीदार अजूनही आपली कारकीर्द वाचवू शकतो असं मत व्यक्त केलं. तो म्हणाला की, 'अजूनही रजत पाटीदारसाठी आशा आहेत. रजत पाटीदारची बॉडी लँग्वेज पाहिली तर तो थोडा नर्व्हस दिसत होता. त्यामुळे तो या स्तरावर खेळताना तो सहज वाटत नव्हता.

कुंबळे म्हणाला की, तुमची बॉडी लँग्वेज सकारात्मक असणे गरजेचे आहे. त्याचा तुमच्या कामगिरीवर देखील परिणाम होत असतो.

रजत पाटीदारने इंग्लंडविरूद्धच्या मालिकेत 32, 9, 5, 0, 17, 0 धावा केल्या आहेत. चौथ्या सामन्यात तो दुसऱ्या डावात शुन्यावर बाद झाला. यामुळे लंचनंतर भारत अडचणीत आला होता. भारताची अवस्था 5 बाद 120 धावा अशी झाली होती.

मात्र शुभमन गिल आणि ध्रुव जुरेल यांनी सहाव्या विकेटसाठी नाबाद 72 धावांची दर्जेदार भागीदारी रचली. गिलने नाबाद 52 तर जुरेलने नाबाद 39 धावा करत भारताला विजय मिळवून दिला.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT