Arjun Tendulkar Ranji Trophy esakal
Cricket

Arjun Tendulkar Ranji Trophy : अर्जुन तेंडुलकरने केली कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी

अनिरुद्ध संकपाळ

Arjun Tendulkar Ranji Trophy : सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर गोव्याकडून रणजी ट्रॉफी खेळतोय. त्याने गुजरातविरूद्ध 49 धावात 4 विकेट्स घेतल्या होत्या. त्याने 21 षटके गोलंदाजी केली. ही त्याची कारकिर्दीतील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली.

अष्टपैलू म्हणून खेळणाऱ्या अर्जुन तेंडुलकरची गोलंदाजीतील कामगिरी उत्तम होत आहे. त्याने आतापर्यंत 12 प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यात 16 विकेट्स घेतल्या आहेत.

अर्जुन तेंडुलकरने रणजी ट्रॉफीमध्ये 4 विकेट्स घेतल्यामुळे त्याचा आत्मविश्वास दुणावण्यास मदत होणार आहे. अर्जुन तेंडुलकरने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एक शतक आणि दोन अर्धशतके देखील ठोकली आहेत.

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर पहिल्या डावात गोव्याने 317 धावा केल्या. अर्जुन तेंडुलकरने 45 धावांची खेळी केली. त्यानंतर अर्जुन तेंडुलकरने चांगला मारा करत गुजरातला 346 धावात रोखण्यात यश मिळवले. रणजी ट्रॉफीच्या पॉईंट टेबलमध्ये सध्या तळात सहाव्या स्थानावर आहे. त्यांचे आतापर्यंत चार गुण झाले आहेत. ते प्ले ऑफसाठी पात्र झालेले नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT