Ranji Trophy Ruturaj Gaikwad esakal
Cricket

Ranji Trophy Ruturaj Gaikwad : ऋतुराज गायकवाडची झुंजार खेळी, महाराष्ट्राचा डाव सावरला मात्र...

Ruturaj Gaikwad : रणजी ट्रॉफीच्या साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात ऋतुराजने महाराष्ट्राचा डाव सावरला

सकाळ वृत्तसेवा

Ranji Trophy 2024 Ruturaj Gaikwad : बाद फेरीत पोहोचण्याच्या आशा संपुष्टात आलेल्या महाराष्ट्राच्या क्रिकेट संघाला रणजी क्रिकेट करंडकातील अ गटातील अखेरच्या साखळी फेरीच्या लढतीत ठसा उमटवता आला नाही. सेनादलविरुद्ध खेळताना त्यांचा पहिला डाव २२५ धावांवर आटोपला. मात्र स्टार खेळाडू ॠतुराज गायकवाड याने ९६ धावांची झुंजार खेळी करताना आपली चुणूक दाखवली. सेनादलने पहिल्या दिवसअखेरीस बिनबाद २७ धावा केल्या असून आता त्यांचा संघ १९८ धावांनी पिछाडीवर आहे.

महाराष्ट्राने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र वरूण चौधरीच्या भेदक गोलंदाजीसमोर महाराष्ट्राच्या फलंदाजांचा निभाव लागला नाही. अर्शिन कुलकर्णी (२ धावा), मुर्तझा ट्रंकवाला (६ धावा), अंकित बावणे (४ धावा), कौशल तांबे (०) यांच्याकडून निराशा झाली. महाराष्ट्राची अवस्था ४ बाद १९ धावा अशी बिकट झाली.

ॠतुराज गायकवाड व दिग्विजय पाटील या जोडीने ९४ धावांची भागीदारी करीत महाराष्ट्राचा डाव सावरला. पण पुलकित नारंगच्या गोलंदाजीवर दिग्विजय पाटील ४२ धावांवर बाद झाला आणि जोडी तुटली. ॠतुराज गायकवाड याने १६१ चेंडूंमध्ये ९ चौकार व एक षटकारासह ९६ धावांची खेळी केली. मात्र त्याचे शतक हुकले. अर्जुन शर्माच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. महाराष्ट्राचा पहिला डाव २२५ धावांवर आटोपला.

सेनादलकडून अर्जुन शर्मा याने ५९ धावा देत महाराष्ट्राचा निम्मा संघ गारद केला. वरुण चौधरी याने ३९ धावा देत चार फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर सेनादलने पहिल्या दिवसअखेरीस पहिल्या डावात बिनबाद २७ धावा केल्या असून शुभम रोहिला १४ धावांवर, तर नितिन तन्वर ९ धावांवर खेळत आहे.

संक्षिप्त धावफलक : महाराष्ट्र - पहिला डाव २२५ धावा (ॠतुराज गायकवाड ९६ - १६१ चेंडू, ९ चौकार, १ षटकार, दिग्विजय पाटील ४२, तरणजीत ढिल्लो ३४, अर्जुन शर्मा ५/५९, वरुण चौधरी ४/३९) वि. सेनादल बिनबाद २७ धावा (शुभम रोहिला खेळत आहे १४, नितिन तन्वर खेळत आहे ९).

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maruti Cars: जीएसटी कमी झाल्यानंतर अल्टो, स्विफ्ट, डिझायर आणि वॅगनआरची किंमत किती असेल?

Prithvi Shaw : IPL 2026 मध्ये पृथ्वी शॉ CSK च्या ताफ्यात? ऋतुराज गायकवाडची मध्यस्थी? फ्रँचायझीने पोस्ट केला Video

न्यायालये ताकदवान नाहीत, हात बांधलेत असं आम्ही म्हणू का? सरन्यायाधीशांचा सरकारला सवाल

Diabetes in Kids: तुमच्या मुलांना डायबिटीजचा धोका आहे का? 'ही' ८ लक्षणे वेळेत ओळखून घ्या योग्य काळजी

Shivaji Maharaj: पुण्यातील मानाचा पहिला गणपती अन् शिवरायांचं बंधन! ; मावळे मोहिमेवर जाण्याआधी घेत असत बाप्पाचं दर्शन

SCROLL FOR NEXT