Ravindra Jadeja - R Ashwin Sakal
Cricket

Ravindra Jadeja: 'नल्ला इरुक्कू, ऍश...' जड्डूच्या तमिळमधील शुभेच्छा ऐकून अश्विनलाही आवरेना हसू

R Ashwin: रविंद्र जडेजाने आर अश्विनला त्याच्या कसोटीतील यशाबद्दल तमिळ भाषेतून शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Ravindra Jadeja Video: भारतीय क्रिकेट संघाने काही दिवसांपूर्वी इंग्लंडविरुद्ध 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 4-1 अशा फरकाने विजय मिळवला. या मालिका विजयात आर अश्विन आणि रविंद्र जडेजा या फिरकीपटूंच्या भारताच्या जोडगोळीने मोलाचा वाटा उचलला.

दरम्यान, याच मालिकेदरम्यान अश्विनने 100 कसोटी सामने खेळण्याचा आणि ५०० कसोटी विकेट्सचा टप्पा पूर्ण केला. याचबद्दल तमिळनाडू क्रिकेट असोसिएशनने त्याचा सत्कारही केला. तसेच जडेजानेही अश्विनने अनोख्या पद्धतीने अभिनंदन केले आहे.

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेनंतर जडेजा आगामी आयपीएल 2024 स्पर्धा खेळण्यासाठी चेन्नई सुपर किंग्स संघात सामील झाला आहे. त्याने चेन्नई संघात सामील झाल्यानंतर अश्विनला तमिळमध्ये खास शुभेच्छा दिल्या आहेत.

त्याचा व्हिडिओही चेन्नईने सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यावर अश्विननेही आता प्रत्युत्तर दिले आहे.

व्हिडिओमध्ये जडेजा म्हणाला, 'हाय ऍश आण्णा, 100 कसोटी सामने आणि 500 कसोटी विकेट्ससाठी अभिनंदन.'

'मी तुझ्यासासाठी खूप खुश आहे. भारतीय क्रिकेटसाठी तुझे योगदान खूप मोठे राहिले आहे. तू खूप विकेट्स घेत राहो आणि तुझे चतुर सल्ले मला देत राहशील, ज्यामुळे मी पण काही विकेट्स घेईल आणि तुझ्यासारखा दिग्गज बनेल, यासाठी तुला शुभेच्छा.'

याशिवाय जडेजा या व्हिडिओमध्ये तमिळमध्ये म्हणाला, 'मीस वेच्चवन इंद्रण, मीस वक्कथवन चंद्रन'. या वाक्याचा मराठीत अर्थ होतो, मिशी असलेला इंद्रण आणि ज्याला मिशी नाही, तो चंद्रन. हा रजनीकांत यांच्या थिल्लू मुल्लू या जुन्या तमिळ चित्रपटातील डायलॉग आहे.

दरम्यान, जडेजा पुढे असेही म्हणाला, 'नल्ला इरुक्कू, ऍश, रोम्बा नल्ला इरुक्कू, ऍश.' (खूप मस्त ऍश, खूप मस्त).

जडेजाच्या या व्हिडिओवर अश्विनने प्रतिक्रियाही दिली आहे. अश्विनने लिहिले की 'जड्डू, मी तुझ्या मेसेजवर माझे आश्चर्य आणि हास्य आवरु शकत नाही.'

दरम्यान, लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या जोड्यांमध्ये अश्विन आणि जडेजा यांची जोडी अव्वल क्रमांकावर आहे. त्यांनी एकत्र खेळताना 500 पेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

VIDEO : रेल्वे पुलासाठी खोदलेल्या खड्ड्यात चार मुलं बुडाली; चौघांची प्रकृती चिंताजनक...यवतमाळमधील घटना, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT