IND vs ENG 3rd Test  esakal
Cricket

IND vs ENG 3rd Test : यशस्वीने रचला पाया, जडेजाने चढवला कळस! भारताची कसोटी क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी

अनिरुद्ध संकपाळ

IND vs ENG 3rd Test : भारताने तिसऱ्या कसोटीत इंग्लंडचा 434 धावांनी पराभव करत इतिहास रचला. भारताचा हा कसोटी क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठा विजय ठरला. भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी 557 धावांचे मोठे आव्हान ठेवले होते. मात्र इंग्लंडचा दुसरा डाव 122 धावात गारद केला. भारताकडून यशस्वी जैस्वालने द्विशतकी तर रोहित शर्मा आणि रविंद्र जडेजाने शतकी खेळी केली. तर गिलने 91 आणि सर्फराज खानने पहिल्या डावात 62 आणि दुसऱ्या डावात 68 धावा केल्या.

भारताचा कोसटी क्रिकेटमधील सर्वात मोठा विजय (धावांच्या अनुशंगाने)

  • 2024 - इंग्लंडविरूद्ध 434 धावांनी विजय (राजकोट)

  • 2021 - न्यूजीलंडविरूद्ध 372 धावांनी विजय (मुंबई)

  • 2015 - दक्षिण आफ्रिकेविरूद्ध 337 धावांनी विजय (दिल्ली)

  • 2016 - न्यूझीलंडविरूद्ध 321 धावांनी विजय (इंदूर)

  • 2008 - ऑस्ट्रेलियाविरूद्ध 320 धावांनी विजय (मोहाली)

भारत आणि इंग्लंड यांच्यात राजकोटच्या निरंजन शाह स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याचा आजचा चौथा दिवस आहे. सामन्यावर भारताने पकड मजबूत केली असून टीम इंडियाने पहिल्या डावात 445 धावा केल्या होत्या. त्यानंतर इंग्लंडचा पहिला डाव 319 धावांवर आटोपला. भारताने दुसऱ्या डावात 4 बाद 430 धावा ठोकत इंग्लंडसमोर विजयासाठी 557 धावांचे आव्हान ठेवले.

भारताकडून यशस्वी जैस्वालने दमदार 214 धावांची द्विशतकी खेळी केली. तर शुभमन गिल 91 धावा करून धावबाद झाला. तर सर्फराज खानने पदार्पणाच्या सामन्यात दुसऱ्या डावात देखील अर्धशतक ठकले. त्याने नाबाद 68 धावा केल्या.

भारताचे 557 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडने दुसऱ्या डावात खराब फलंदाजी केली. पहिल्या 10 षटकातच इंग्लंडच्या 2 विकेट्स गेल्या होत्या. चहापानानंतर इंग्लंडने 2 बाद 18 धावांपासून पुढे खेळण्यास सुरूवात केली.

मात्र अवघ्या 32 धावात इंग्लंडने पाच विकेट्स गमावल्या. भारताकडून फिरकीपटू रविंद्र जडेजाने 4 तर कुलदीप यादवने 2 विकेट्स घेत इंग्लंडच्या फलंदाजीचे कंबरडेच मोडले. अश्विनने देखील आपले विकेट्सचे खाते उघडले. त्याने 16 धावा करणाऱ्या हार्टलीला बाद करत इंग्लंडला नववा धक्का दिला.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT