Reliance-Disney Merger Indian Cricket esakal
Cricket

Reliance-Disney Merger : तब्बल 70,352 कोटी! रिलायन्स-डिस्ने विलीनीकरणामुळे भारतीय क्रिकेटचं गणितच बदलणार?

Reliance-Disney Merger : रिलायन्स - डिस्ने यांच्या विलीनीकरणाने भारतीय क्रिकेट चाहत्यांवर, बीसीसीआय आणि आयसीसीवर देखील काय परिणाम होणार आहे?

अनिरुद्ध संकपाळ

Reliance-Disney Merger Indian Cricket : भारतीय क्रिकेटवर भविष्यात मोठा परिणाम करणारी एक डील नुकतीच झाली आहे. रिलायन्स आणि डिस्ने इंडियाचे विलीनीकरण झालं आहे. याचा भारतातील क्रिकेट प्रक्षेपण क्षेत्रावर मोठा परिणाम होणार आहे. यामुळे प्रेक्षकांना सर्व मोठ्या क्रिकेट स्पर्धा एकाच प्लॅटफॉर्मवर पहावयास मिळणार आहे. तो प्लॅटफॉर्म म्हणजे जिओ सिनेमा!

रिलायन्स इंडस्ट्रिज आणि डिस्ने स्टार इंडियाचे विलीनीकरण मुल्य हे जवळपास 70,352 कोटी रूपयांच्या आसपास आहे. या विलीनीकरणाचा थेट परिणाम हा भारतातील क्रिकेट चाहत्यांवर होणार आहे.

या विलीनीकरणाच्या रणनितीमुळे ज्या पद्धतीने भारतातील चाहते क्रिकेट पाहत होते ती पद्धतच बदलून जाणार आहे. यात पारंपरिक टीव्ही प्रक्षेपण आणि लाईव्ह स्ट्रिमिंग यांचा देखील समावेश आहे. क्रिकेटसाठी आता जिओ हा सर्वात प्रमुख डिजीटल प्लॅटफॉर्म असणार आहे. त्यामुळे आपल्याला या गोष्टी माहीत होणे गरजेचे आहे.

इंडियन क्रिकेटवर एकच प्लॅटफॉर्म वर्चस्व गाजवणार

रिलायन्स डिजिटलचा जिओ सिनेमा हा प्लॅटफॉर्म भारतातील क्रिकेट स्पर्धांचे स्ट्रिमिंग करणारा सर्वात मोठा प्लॅटफॉर्म ठरणार आहे. यात आयपीएल, देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा आणि आयसीसीच्या प्रमुख स्पर्धांचा समावेश आहे. तर स्टार स्पोर्ट्स हे भारतातील क्रिकेट सामने टेलिकास्ट करणारं प्रमुख चॅनेल होईल.

दोन दिग्गजांच विलीनीकरण

रिलायन्स आणि डिस्नेच्या विलीनीकरणाला नुकतेच मूर्तरूप आल्यामुळे डिस्ने हॉटस्टारच्या भारतीय बाजारपेठेतून बाहेर पडण्याची प्रक्रिया वेग येऊ शकतो. त्यांच्याकडे सध्या आयसीसी ब्रॉडकास्टिंग हक्क आहेत. हे हक्क भारतात तरी जिओ सिनेमाकडे जातील.

याचबरोबर स्पोर्ट्स 18 आणि रिलायन्सचे इतर स्पोर्ट्स चॅनेल देखील भारतीय क्रिकेट ब्रॉडकास्टिंग जगतातील मोठे प्लेअर बनी शकतात. भारताच्या द्विपक्षीय मालिका आणि महिला प्रीमियर लीग हे स्टार स्पोर्ट्सवरच पाहिले जाऊ शकते.

नियमांचा येऊ शकतो अडथळा

रिलायन्स आणि डिस्ने विलीनीकरणचा करार झाल्याचं 28 फेब्रुवारीला जाहीर करण्यात आलं मात्र आता या प्रक्रियेला कॉम्पेटिशन कमिशन ऑफ इंडिया (CCI) आणि कायदेशी संस्थांची देखील परवानगी मिळणे गरजेचे आहे. या प्रक्रियेला जवळपास 10 ते 12 महिने लागू शकतात.

त्यामुळे आयपीएल 2024 आणि जूनमध्ये होणारा टी 20 वर्ल्डकपवर मात्र या विलीनीकरणाचा कोणताही परिणाम होणार नाहीये. या दोन स्पर्धा स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टारवरूनच प्रक्षेपित होणार आहेत. मात्र या विलीनीकरणामुळे जिओ सिनेमाला चॅम्पियन्स ट्रॉफी प्रक्षेपित करण्याची संधी मिळणार आहे.

याचबरोबर महिला प्रीमियर लीग जिओवर आणि महिलांचे सामने स्टार स्पोर्ट्सवर प्रक्षेपित केली जाऊ शकतात. या नव्या प्लॅटफॉर्मचे नाव जिओ स्टार स्पोर्ट्स असं देखील असू शकतं.

विलीनीकरणाचा क्रिकेट संघटनांवर काय होणार परिणाम?

बीसीसीआय आणि आयसीसी यांची भागीदारी अजून मजबूत होऊ शकते. जिओ आणि डिस्ने स्टार हे त्यांचे प्लॅटफॉर्म वाढवण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे क्रिकेट ब्रॉडकास्टिंगचे भविष्य उज्वल दिसते.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT