Rishabh Pant India Tour Of Australia 2024-25 Esakal
Cricket

Rishabh Pant: ना विराट ना रोहित; ऑस्ट्रेलियाला वाटतेय रिषभ पंतची भीती

India Tour Of Australia: ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने पंतची तुलना ट्रॅव्हिस हेड व मिचेल मार्श यांच्याशी केली. त्याच्या मते, रिषभ पंतच्या धावा रोखून धरणे सर्वाधिक महत्त्वाचे असेल.

Gaurav Divekar

बांगलादेशवर दणदणीत विजय मिळवत भारताने कसोटी क्रिकेटमधील वर्चस्व कायम राखले आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये भारत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे आणि त्यापूर्वीच ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी भारतीय संघाविषयी भाष्य करण्यास सुरुवात केली आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा २२ नोव्हेंबरपासून सुरु होत आहे. त्यापूर्वी बांगलादेशविरुद्धची एक कसोटी आणि न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका होणार आहे. या सामन्यांमधील भारतीय संघाच्या कामगिरीवर ऑस्ट्रेलियन संघाचे बारीक लक्ष असणार आहे.

बॉर्डर गावसकर करंडक स्पर्धेसाठी तयारी करताना ऑस्ट्रेलियाचा संघ विराट कोहली किंवा रोहित शर्मा यांच्याऐवजी चक्क रिषभ पंतवर जास्त लक्ष केंद्रीत करत आहे. २०२२ मध्ये झालेल्या भीषण अपघातानंतर रिषभ पंत दीर्घकाळ क्रिकेटपासून दूर होता. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याने थाटातच पुनरागमन केले.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने पंतची तुलना ट्रॅव्हिस हेड व मिचेल मार्श यांच्याशी केली. त्याच्या मते, रिषभ पंतच्या धावा रोखून धरणे सर्वाधिक महत्त्वाचे असेल आणि त्यासाठी योजना तयार करण्याची गरज आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध बहरतो रिषभचा खेळ

ऑस्ट्रेलियात झालेल्या गेल्या दोन मालिकांमध्ये भारताच्या यशामध्ये रिषभ पंतचा मोठा वाटा होता. दोन दौऱ्यांतील सात कसोटींमध्ये त्याने एक शतक व दोन अर्धशतकांसह ६२४ धावा केल्या आहेत.

२०१८-१९ च्या दौऱ्यामध्ये रिषभने भारताकडून दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च धावा केल्या होत्या. त्या दौऱ्यात भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका जिंकत पराक्रम केला होता. त्यानंतर २०२०-२१ मध्येही संघ अडचणीत असताना रिषभने केलेल्या अफलातून फलंदाजीमुळे भारताने गॅबा कसोटीत अविस्मरणीय विजय मिळवला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT