Rishabh Pant Vs Sanju Samson T20 World Cup 2024 ESAKAL
Cricket

Rishabh Pant Vs Sanju Samson : टी 20 वर्ल्डकपसाठी ऋषभ पंत की संजू सॅमसन कोण आहे टीम इंडियाची पहिली पसंती?

अनिरुद्ध संकपाळ

Rishabh Pant Vs Sanju Samson : या महिन्याच्या शेवटी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ टी 20 वर्ल्डकप खेळण्यासाठी युएसएला रवाना होणार आहे. भारत आपली मोहीम 5 जूनपासून सुरू करणार आहे. भारताचा पहिला सामना हा आयर्लंडविरूद्ध होणार आहे. ऋषभ पंतने अपघातानंतर जवळपास दीड वर्षांनी भारतीय संघात पुनरागमन केलं आहे. ऋषभ पंत सोबतच संजू सॅमसन देखील भारतीय संघात आहे. टीम इंडियासमोर दोन विकेटकिपर्सचा पर्याय उपलब्ध आहे.

दरम्यान, भारतीय संघ प्लेईंग 11 निवडताना कोणाला पहिली पसंती देणार हा मोठा प्रश्न आहे. दोन्ही विकेटकिपर हे आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करत आहेत. दरम्यान, भारतीय संघ कोणत्या विकेटकिपरला पहिली पसंती देईल याबाबत गौतम गंभीरने आपले मत व्यक्त केले.

ऋषभ पंतच का?

गौतम गंभीरने आगामी टी 20 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ विकेटकिपर म्हणून ऋषभ पंतला पहिली पसंती देईल असा अंदाज वर्तवला आहे. गंभीरने यासाठी दोन कारणे दिली आहे. गंभीरने आयपीएलमधील पंत आणि सॅमसन हे वेगवेगळ्या परिस्थितीत फलंदाजीला येत असल्याचं सांगितलं.

तो म्हणाला की, 'पतंने आयपीएलमध्ये मधल्या फळीत फलंदाजी केली आहे. संजू वरच्या फळीत फलंदाजी करतो. टॉप ऑर्डरमध्ये भारतीय संघात रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल आणि विराट कोहली हे टॉप ऑर्डरमध्ये खेळतात. त्यामुळे मधल्या फळीत पंतसारख्या फलंदाजाची भारतीय संघाला गरज आहे.'

डावखुरा पंत बलस्थान

गंभीरने ऋषभ पंत हा डावखुरा फलंदाज असल्याचं अखोरेखित केलं. तो म्हणाला की, ऋषभ पंतमुळे भारतीय संघाच्या मधल्या फळीत वैविध्यता येईल. लेफ्ट - राईट कॉम्बिनेशनबाबत गंभीर म्हणाला की, 'पंत डावखुरा फलंदाज असल्याने संघाच्या मधल्या फळीत वैविध्यता येईल.

सॅमसनला देखील मिळू शकतं प्राधान्य

गौतम गंभीरनं जरी पंतच्या पारड्यात झुकतं माप टाकलं असलं तरी संघ व्यवस्थापन संजू सॅमसनला देखील प्राधान्य देऊ शकते. गंभीर याबाबत म्हणाला की, 'जर संघ व्यवस्थापन संजूला मॅच फिनिशरच्या भुमिकेत पाहत असेल तर संजू देखील सहाव्या किंवा सातव्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. कोणीही प्लेईंग 11 मध्ये खेळू देत आपल्याला प्रत्येक खेळाडूला समर्थन द्यावं लागेल.'

(Cricket Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त उद्धव-राज ठाकरे येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT