Rohit Sharma Ajit Agarkar Press Conference Rinku Singh esakal
Cricket

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

अनिरुद्ध संकपाळ

Rohit Sharma Ajit Agarkar Press Conference Rinku Singh : वेस्ट इंडीज आणि अमेरिकेत होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपसाठी भारताने नुकताच आपला 15 खेळाडूंचा संघ घोषित केला. या संघात केकेआरचा स्टार मॅच फिनिशर रिंकू सिंह यांचा समावेश करण्यात आला नसल्यानं सर्वत्र टीकेची झोड उठली आहे.

आज भारतीय संघाचा कर्णधरा रोहित शर्मा आणि निवडसमिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी रिंकू सिंहला का वगळलं याचं कारण स्पष्ट केलं. आधी त्याची स्पर्धा ही शिवम दुबेसोबत होती असा अंदाज होता. मात्र त्याला वेगळ्याच कारणामुळे संघा स्थान मिळालं नसल्याचं अजित आगरकरने सांगितलं.

अजित आगरकर म्हणाला की, 'रिंकू सिंहची निवड न होणं हे अत्यंत दुर्दैवी होतं. त्यानं काहीही चुकीचं केलेलं नाही. शुभमन गिलच्या बाबतीत देखील असंच आहे. आम्हाला संघात काही रिस्ट स्पिनर हवे होते. यामुळे रोहित शर्माला अधिक पर्याय मिळतील.'

अजित आगरकर पुढे म्हणाला की, 'अक्षरच्या बाबतीत देखील तेच आहे. तो बॅटिंग ऑल राऊंडर आहे. त्यामुळं आमच्याकडे अजून एक गोलंदाजीचा पर्याय असावा असं आम्हाला वाटलं. त्याच्यासाठी हे खूप कठिण आहे. मात्र शेवटी आम्हाला 15 चा संघाच निवडायचा असतो.'

रोहित शर्माने संघात चार फिरकीपटू घेण्याबाबत देखील थोडक्यात उत्तर दिलं. तो म्हणाला की, 'संघात चार फिरकीपटू घेण्याचं काही कारण आहे. सामना सकाळी 10 वाजता सुरू आहे. आता फार काही सांगत नाही. मात्र ज्यावेळी अमेरिकेत पहिली पत्रकार परिषद घेईन त्यावेळी याबाबत अधिक सांगेन.'

(Cricket Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाणी देता का पाणी? नसेल तर गाव विकायचंय, आम्ही कर्नाटकात जातो; सोलापूर, सांगलीतले गावकरी आक्रमक

AI मुळे १ अब्ज लोकांचा मृत्यू? बिल गेट्स यांचा गंभीर इशारा, नेमकं काय सांगितलं?

Latest Marathi News Live Update : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात ठाणे काँग्रेस आक्रमक

२ ऑक्टोबरला मोठं आंदोलन, पण त्याआधीच CJPला मोठा धक्का; प्रमुख नेत्याला डेंग्यू

Ramesh Mhatre: रमेश म्हात्रेंना सुप्रीम कोर्टाचा झटका! डॉक्टर मारहाण प्रकरणात जामीन रद्द, पुन्हा कोठडीत रवानगी

SCROLL FOR NEXT