Rohit Sharma
Rohit Sharma 
क्रिकेट

Rohit Sharma T20 Captain : हार्दिक नाही तर रोहितच कर्णधार! खुद्द जय शहांनीच केलं स्पष्ट; पाहा VIDEO

अनिरुद्ध संकपाळ

Rohit Sharma T20 Captain Jay Shah Conformation : भारतीय संघाचे टी 20 वर्ल्डकपमध्ये कोण नेतृत्व करणार हा मोठा प्रश्न आहे. रोहित शर्मा टी 20 संघात परतला आहे अन् हार्दिक पांड्या हा दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. त्यामुळे संघाची धुरा हार्दिकच्या खांद्यावर असेल की रोहित शर्माच्या खांद्यावर हे गुलदस्त्यात आहे. निवडसमितीने देखील याबाबत स्पष्ट असे काही सांगितलेले नाही. दरम्यान, बीसीसीआयचे अध्यक्ष जय शहा यांनी याबाबत नुकतेच मोठे वक्तव्य केले.

राजकोट स्टेडियमचे नामकरण निरंजन शहा स्टेडियम करण्यात आलं. या कार्यक्रमावेळी जय शहा बोलताना म्हणाले की, 'आपण जरी 2023 ची वर्ल्डकप फायनल हरलो असलो तरी आपण सलग 10 सामने जिंकून चाहत्यांची मने जिंकली. मला विश्वास आहे की आपण रोहित शर्माच्या कॅप्टन्सीखाली 2024 चा टी 20 वर्ल्डकप नक्कीत उंचावू.'

रोहित शर्मा हा वनडे वर्ल्डकपचं वर्ष सुरू होतं त्यावेळी टी 20 क्रिकेटमधून ब्रेक घेतला होता. त्या काळात भारतीय टी20 संघाचे नेतृत्व हे हार्दिक पांड्या करत होता. मात्र वर्ल्डकपनंतर रोहित शर्मा टी 20 संघात परतला असून तो कर्णधार देखील झाला आहे.

मात्र मुंबई इंडियन्सने लिलावापूर्वीच हार्दिक पांड्याला ट्रेड करत पुन्हा संघात आणलं. मुंबई इंडियन्सने हार्दिकला फक्त संघात परत आणलं नाही तर रोहितचं कर्णधारपद काढून घेत ते हार्दिक पांड्याला दिलं. त्यामुळे या दोघांमध्ये कर्णधारपदावरून रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून आलं. आता जय शहांनी या रस्सीखेचाचा अप्रत्यक्षरित्या निकालच जाहीर करून टाकला आहे.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT