Rohit Sharma | Team India | T20 World Cup 2024 Sakal
Cricket

Rohit Sharma: घरी परतल्यानंतर रोहितला तिलक वर्मा-भाऊ विशाल अन् मित्रांकडून सॅल्युट, पाहा कसं झालं हिटमॅनचं जंगी स्वागत

Rohit Sharma Viral Video: टी20 वर्ल्ड कप जिंकून रोहित शर्मा जेव्हा घरी परतला, तेव्हा देखील त्याचे कुटुंब आणि मित्रपरिवाराकडून जोरदार स्वागत झाले.

सकाळ डिजिटल टीम

Rohit Sharma Viral Video: रोहित शर्मा मायदेशी येईपर्यंत टी-20 वर्ल्ड कप विजयाचा जल्लोष थांबला नाही. रोहित शर्मा घरी पोहोचताच, त्याचे बालपणीचे मित्र तेथे उपस्थित होते, ज्यांनी त्याचे जोरदार स्वागत केले.

टी20 वर्ल्ड कप 2024 चे विजेतेपद जिंकून मायदेशी परतलेल्या टीम इंडियाचा विजयोत्सव गुरुवार, 4 जुलै रोजी सुमारे 16 तास चालला. बार्बाडोसहून सकाळी 6.00 वाजताच्या सुमारास दिल्लीत पोहोचलेल्या टीम इंडियाने आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आणि त्यानंतर मुंबईत वर्ल्ड कप जिंकल्याचा आनंद साजरा केला.

मरीन ड्राईव्हवर भारतीय संघाची विजयी मिरवणूक झाल्यानंतर वानखेडे स्टेडियमवर बीसीसीआयकडून खेळाडूंना १२५ कोटी रुपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले.

इतके झाल्यानतंरही भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचा उत्सव सोहळा येथेच थांबला नाही. रोहित पोहोचल्यानंतरही भारताचा आणि मुंबई इंडियन्सचा युवा खेळाडू तिलक वर्मा, धाकटा भाऊ विशाल यांच्यासह त्याचे मित्र त्याच्या स्वागतासाठी सज्ज झाले होते.

रोहित शर्माच्या स्वागतासाठी सर्वप्रथम सर्व मित्रांनी एका रांगेत उभे राहून त्याला सलामी ठोकली. यानंतर सर्वांनी त्याला खांद्यावर उचलले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

29 जून रोजी टीम इंडियाने टी20 वर्ल्ड कप 2024 चे विजेतेपदाच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करून विजेतेपद पटकावले. मात्र त्यानंतर बार्बाडोसमधील वादळामुळे खेळाडू तीन दिवस तिथेच अडकले होते.

अखेर बीसीसीआयने भारतीय खेळाडूंना विशेष चार्टर्ड विमानाने देशात आणले. यानंतर गुरुवारी संपूर्ण दिवस म्हणजेच भारतीय संघाने दिल्ली आणि मुंबईत हा विजय साजरा केला.

वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सत्कार समारंभानंतर खेळाडूंनी स्टेडियममध्ये फिरून उपस्थित चाहत्यांचे आभार मानले. यावेळी विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पांड्यासह टीमचे खेळाडूही डान्स करतानाही दिसले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Crime : निर्माल्य विसर्जनानंतर पतीसोबत काढला 'सेल्फी' अन् महिलेने नदीत मारली उडी; दोघांत असं काय घडलं?

'मुंबई फक्त परप्रातियांमुळे, नाहीतर मराठी लोकांची परिस्थिती बिकट' प्रसिद्ध अभिनेत्रीच वादग्रस्त वक्तव्य, ट्रोल होताच मागितली माफी

उत्तर भारतात पुन्हा विमान अपघाताची शक्यता? ज्योतिषाचार्यांनी शेअर मार्केटचं ही वर्तवलं भविष्य

Latest Maharashtra News Updates : घाटकोपर-वर्सोवा मेट्रो सेवा २० मिनिटे ठप्प, प्रवाशांचा संताप

M S Dhoni Video : मोजक्या मित्रांसह धोनीने साजरा केला ४४वा वाढदिवस, माहीच्या बर्थडे सेलिब्रेशनचा खास व्हिडीओ पाहाच..

SCROLL FOR NEXT