rohit sharma and rahul dravid odi world cup team india Latest News Marathi
rohit sharma and rahul dravid odi world cup team india Latest News Marathi sakal
क्रिकेट

Mohammad Kaif : वर्ल्ड कप 2023 मधील पराभवासाठी रोहित-द्रविडला जबाबदार; टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू स्पष्टच बोलला

Kiran Mahanavar

Mohammad Kaif on World Cup 2023 : भारतीय संघ आणि कर्णधार रोहित शर्मासाठी एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 हे सर्वात मोठे मिशन होते. मेगा इव्हेंटच्या सुरुवातीपासूनच भारतीय संघ ट्रॉफीचा मोठा दावेदार होता. आणि कर्णधार रोहित शर्मा अॅड कंपनीने उपांत्य फेरीसह सलग 10 सामने जिंकले, परंतु फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा पराभव केला. त्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले. आता माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफनेही यावर आपले मत व्यक्त केले आहे.

एका मुलाखतीदरम्यान मोहम्मद कैफ म्हणाला की, “फायनल सामन्याआधी मी रोहित शर्मासोबत तीन दिवस अहमदाबाद तिथे होतो. रोहित शर्मा आणि कोच राहुल द्रविड तिथल्या खेळपट्टीवर सतत लक्ष ठेवून होते. त्याने खेळपट्टीवरही बराच वेळ घालवला. खेळपट्टीचा रंग दर दिवशी बदलत होता. खेळपट्टीवर गवत आणि पाण्याची कमतरता होती. ऑस्ट्रेलियाला संथ खेळपट्टी द्यावी, असा भारताचा विचार होता. जे पुढे भारतावरच ओझे बनले.”

कैफ पुढे म्हणाला की, “खेळपट्टीवर गवत आणि पाणी नसल्यामुळे खेळपट्टी खूपच संथ झाली होती. ते खरे आहे. पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क वेगवान गोलंदाजी करतात. क्युरेटरने आपले काम चोख बजावल्याचे लोक म्हणाले होते. आम्हीही काही बोललो नाही. तुम्ही सतत खेळपट्टी पाहत असताना, तुम्ही क्युरेटरशी संवाद साधला पाहिजे. तुम्ही फक्त दोन ओळी म्हणाल्या की खेळपट्टीला पाणी देऊ नका आणि गवत कमी करू नका.”

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामन्यासाठी जुन्या खेळपट्टीचा वापर करण्यात आला होता. हा सामना त्या खेळपट्टीवर खेळला गेला ज्यावर यापूर्वी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना पाहायला मिळाला होता.

त्यामुळे पहिल्या डावात भारतीय संघाला मधल्या षटकांमध्ये धावांसाठी संघर्ष करावा लागला. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी मदत मिळाली आणि कांगारू संघाने 47 षटकांत 241 धावांचे लक्ष्य गाठले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Boycott Exit Polls: मतदानोत्तर चाचणीच्या चर्चांवर काँग्रेसचा बहिष्कार; काँग्रेसनं का घेतला असा निर्णय?

Exit Polls 2024: एक्झिट पोल्स महत्वाचे आहेत का? 'या' कारणांमुळं चुकू शकतो अंदाज

IND vs BAN Playing 11 : सराव सामन्यातच ठरणार सलामी जोडी; बुमराहचा पार्टनर कोण असणार?

Virat Kohli : सेमी फायनल, फायनल आली की विराट.... मांजरेकर म्हणतात किंग कोहली टीम इंडियासाठी चिंतेचा विषय

Latest Marathi Live News Update: जीडीपीची आकडेवारी पाहून मोदींनी मानले कष्टकऱ्यांचे आभार

SCROLL FOR NEXT