Rohit Sharma
Rohit Sharma  esakal
क्रिकेट

Rohit Sharma Retirement : ...तर मी थेट निवृत्ती घेईन! पाचव्या कसोटीनंतर कर्णधार रोहित शर्माने दिली मोठी हिंट

अनिरुद्ध संकपाळ

Rohit Sharma Retirement : भारताने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा 4-1 असा पराभव करत कसोटी मालिकेवर कब्जा केला. मालिकेत रोहित शर्माने लिडिंग फ्रॉम द फ्रेंट असे नेतृत्व केले. पहिल्या कसोटीतील पराभवानंतर युवा संघाला हाताशी घेऊन हिटमॅनने मालिका जिंकून दाखवली. दरम्यान, पाचवा कसोटी सामना झाल्यावर रोहित शर्माला त्याच्या निवृत्तीबाबत विचारण्यात आलं त्यावेळी त्याने भन्नाट उत्तर देत सर्व टीकाकारांचे तोंड बंद केले.

पाचवा कसोटी सामना जिंकल्यानंतर जिओ सिनेमाशी बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, 'मला असं वाटतं की एकेदिवशी मी उठल्यावर मला मी आता फार चांगला खेळत नाहीये, मी हा खेळ खेळण्या योग्य राहिलो नाही असं वाटेल त्याक्षणी मी निवृत्ती घेईन. त्यावेळी मी फक्त सर्वांना सांगून टाकेन.'

'मात्र खरं सांगू का मला गेल्या दोन ते चार वर्षापासून माझी कामगिरी उंचावली असल्याचं मला वाटतं. मी सध्या माझं बेस्ट क्रिकेट खेळत आहे.'

रोहित शर्मा पुढे म्हणाला की, 'मी आकड्यांकडे पाहणारा खेळाडू नाही. मोठ्या धावा करणं आणि ती आकडेवारी महत्वाची असते. मात्र खेळाडू त्यांच्या नैसर्गिक खेळ खेळतील कल्चर संघात तयार केलं आहे. तुम्ही पाहिलं असेल की संघातील खेळाडू हे जाऊन खुलेपणाने आपलं क्रिकेट खेळत आहेत. आम्ही संघातून माईल स्टोन अन् आकडेवारी काढून टाकली आहे.'

'खेळाडू आता आकड्यांसाठी खेळत नाहीत. ते त्यांची वैयक्तिक धावसंख्या पाहत नाहीत. सामना खेळत राहा आकडेवारी आपोआप सुधारत जाईल. जर तुम्ही बिंधास्तपणे खेळाल, तुमची मानसिकता स्पष्ट असेल तर इतर गोष्टी आपोआपच होतात.'

रोहित शर्मा दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी करण्याबद्दल देखील बोलला. तो म्हणाला की, आम्ही इंग्लंडविरूद्ध पहिली कसोटी हरलो मात्र त्यानंतर दुसरी तिसरी आणि चौथी कसोटी जिंकलो. दक्षिण आफ्रिकेत आम्हाला फक्त 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळायला मिळाली याबद्दल मी नाराज आहे.'

(Cricket News in Marathi)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

IPL 2024: 'मला फक्त शेवटची संधी द्या...', RCB कडून खेळणाऱ्या स्वप्नील सिंगला व्यक्त होताना अश्रु अनावर

Pune Rain Updates : पुण्यात वादळी वाऱ्यासह पाऊस! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

SCROLL FOR NEXT