MS Dhoni with Ruturaj Gaikwad and Ravindra Jadeja Sakal
Cricket

MS Dhoni Birthday: 'भाईजान'सोबतच्या वाढदिवशी धोनीला CSK च्या कर्णधाराचा आला व्हिडिओ कॉल, Photo व्हायरल

Ruturaj Gaikwad Birthday Wish to MS Dhoni: एमएस धोनीवर त्याच्या ४३ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव झाला असून चेन्नई सुपर किंग्सच्या कर्णधारानेही त्याला स्पेशल व्हिडिओ कॉल केला होता.

सकाळ डिजिटल टीम

Ruturaj Gaikwad Birthday Wish to MS Dhoni: भारताचा दिग्गज क्रिकेटपटू आणि कर्णधार म्हणून ओळख असलेला महेंद्रसिंह धोनी हा रविवारी 43 वर्षांचा झाला. जगातील एकमेव कर्णधार ज्याने तीन वेगवेगळ्या आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आहेत. धोनीला रविवारी त्याच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील लोकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, सध्या धोनी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्यासाठी मुंबईमध्ये आहे. त्यामुळे त्याने त्याचा वाढदिवस पत्नी साक्षी व काही खास मित्रांसोबत येथेच साजरा केला आहे. यामध्ये धोनीला शुभेच्छा देत सलमान खानने देखील हजेरी लावली.

इतकेच नाही, तर वाढदिवसच्या सेलेब्रेशननंतर चेन्नई सुपर किंग्सचा युवा कर्णधार ऋतुराज गायकवाडचा सरप्राईज व्हिडियो कॉलही धोनीला आला होता.

मध्यरात्री वाढदिवस साजरा केल्यानंतर त्याला ऋतुराज गायकवाडचा व्हिडियो कॉल आला, ऋतुराज सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे, त्याच्यासोबत त्याचे संघसहकारी तुषार देशपांडे, मुकेश कुमार यांनीही धोनीला शुभेच्छा दिल्या. चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज याने इंस्टाग्रामवर व्हिडीयो कॉलचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे.

ऋतुराज हा झिम्बाब्वेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघाचा भाग आहे. भारतीय संघ या मालिकेत शुभमन गिलच्या नेतृत्वात खेळत आहे. या मालिकेसाठी टी-20 वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघातील अनेक खेळाडूंना विश्रांती दिली आहे.

सलमान खाननेही दिल्या शुभेच्छा

दरम्यान, अभिनेता सलमान खाननेही धोनीबरोबरचा फोटो शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. धोनीच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनदरम्यानचा एक कॅन्डीड फोटो सलमानने सोशल मिडीयावर शेअर केला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये 'वाढदिवसाच्या शुभेच्छा कप्तान साहब.'

धोनीने ऋतुराजच्या खांद्यावर सोपवली जबाबदारी

दरम्यान, आयपीएल २०२४ स्पर्धेपूर्वी धोनीने चेन्नई सुपर किंग्स संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी ऋतुराज गायकवाडच्या खांद्यावर सोपवली होती. त्यामुळे ऋतुराज चेन्नईचे नेतृत्व करणारा चौथाच खेळाडू ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंचं 'Arrest Warrant' घेवून नाशिक पोलिस मुंबईतील लीलावती रूग्णालयात दाखल!

Doctors Prescription: आता डॉक्टरांना स्पष्ट प्रिस्क्रिप्शन लिहिणे बंधनकारक! एनएमसीचा कठोर आदेश; निर्णयामागचं कारण काय?

IPL 2026: 'बाकी फ्रँचायझी झोपल्या असताना मुंबई इंडियन्सने संधी साधली' R Ashwin ला नेमकं काय म्हणतोय?

Maharashtra Cabinet Reshuffle : राज्य मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेला वेग; वसमतचे आमदार राजू नवघरे मंत्री होण्याची दाट शक्यता!

Bhimashankar History : ८० वर्षांनंतर भीमाशंकरची सावली पुन्हा; जुन्नर–आंबेगावात नरभक्षक बिबट्यांची दहशत!

SCROLL FOR NEXT