Sachin Tendulkar  esakal
Cricket

Sachin Tendulkar VIDEO : सचिन भेटला क्रिकेटच्या खऱ्या हिरोला... काश्मीर ट्रिप केली 'यादगार'

Sachin Tendulkar Meet Amir Hussain : सचिन अन् दिव्यांग क्रिकेटपटू आमिरने केला फेमस फॉरवर्ड डिफेन्स

अनिरुद्ध संकपाळ

Sachin Tendulkar Amir Hussain VIDEO : भारताचा मास्टर ब्लास्टर सध्या काश्मीरची ट्रीप करतोय. या ट्रीपमधील नयनरम्य दृश्य सचिन आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरू शेअर करतोय. मात्र त्यानं एक व्हिडिओ शेअर करत क्रिकेटमधील खऱ्या हिरोला भेटल्याची भावान व्यक्त केली. कोण आहे हा रिअर हिरो ज्यामुळे क्रिकेटचा देव देखील भारावरून गेला आहे.

सचिन तेंडुलकर कुटुंबासोबत जम्मू काश्मीरच्या सहलीवर आहे. मात्र त्याने यातूनही वेळ काढत दिव्यांग क्रिकेटपटू आमिरची भेट घेतली. आमिरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आमिरने दोन्ही हात वयाच्या आठव्या वर्षी गमावले होते. मात्र त्यानंतरही खचून न जाता त्याने आपली पॅशन क्रिकेट खेळणं सोडलं नाही.

शारिरीक अडचणींवर मात करत त्याने हात नसतानाही मान अन् खांद्याच्या वापर करत बॅट पकडून क्रिकेट खेळण्याचं कसब आत्मसात केलं.

मध्यंतरी आमिर हुसैनचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ सचिन तेंडुलकरच्या देखील पाहण्यात आला. त्यावेळी सचिन तेंडुलकरने एएनआयच्या व्हिडिओवर प्रतितिक्रिया दिली होती.

सचिन म्हणाला होता की, 'आमिरने अशक्य ते शक्य करून दाखवलं आहे. मी हा व्हिडिओ पाहून खूप भावूक झालो आहे. यावरून त्याचे खेळावर किती प्रेम आणि समर्पण आहे हे दिसून येतं. मला आशा आहे की मी एक दिवशी त्याला भेटेन आणि त्याच्या नावाची जर्सी त्याच्याकडून घेईन. खेळाबद्दल पॅशिनेट असलेल्या लाखो लोकांना तू प्रेरित केलं आहेस वेल डन!'

सचिन तेंडुलकरने आमिरला भेटण्याची इच्छा अखेर पूर्ण केली. कुटुंबासोबत काश्मीर फिरायला गेल्यावर त्याने वेळ काढून आमिरची भेट घेतली. यावेळी आमिरचे सर्व कुटुंबीय देखील सचिनला भेटलं अन् सचिनने आपली स्वाक्षरी असलेली बॅट देखील आमिरला दिली. त्यावर खरा हिरो आमिरीसाठी, सर्वांना असच प्रेरित करत रहा!

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : यापुढे कुणालाही मारलं तर त्याचे व्हिडीओ काढू नका - राज ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT