Sarfaraz collapses on ground after Mohammad Wasim deadly throw bangs his head during PSL cricket news in marathi  sakal
Cricket

Video Viral : हेल्मेट आहे तरी कुठे... भर सामन्यात मरता मरता वाचला सर्फराज, खेळाडूने डोक्यात मारला बॉल अन्...

भारतीय क्रिकेट संघ सध्या घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये भरपूर धावा करणाऱ्या सर्फराज खानला या मालिकेदरम्यान कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली.

Kiran Mahanavar

भारतीय क्रिकेट संघ सध्या घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये भरपूर धावा करणाऱ्या सर्फराज खानला या मालिकेदरम्यान कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली.

रांची कसोटी सामन्यात भारतीय फलंदाज सर्फराज खान क्षेत्ररक्षण करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये हेल्मेटशिवाय शॉट फिल्डिंग करताना त्याला कर्णधार रोहित शर्माने फटकारले. हिटमॅनने त्याला स्पष्टपणे सांगितले की, हिरो बनू नको, हेल्मेट घाल. भारतीय कर्णधाराने सर्फराज खानला दुखापत होण्यापासून वाचवले पण पाकिस्तानचा माजी कर्णधार सर्फराज खान त्याच्या चुकीमुळे जखमी झाला.

रविवारी पाकिस्तान सुपर लीग सामन्यामध्ये क्वेटा ग्लैडिएटर्सचा यष्टीरक्षक सर्फराज खानला गंभीर दुखापत झाली. झालं असं की, सामन्यात मोहम्मद वसीमने कॅच घेतल्यानंतर चेंडू हावेत फेकलेला जो थेट सर्फराजच्या डोक्यात लागला. दुखापत इतकी गंभीर होती की त्याला मैदान सोडावे लागले. सर्फराजच्या जागी सज्जाद अली पर्यायी खेळाडू म्हणून मैदानात खेळायला आला.

मुलतान सुल्तान्सच्या डावात शेवटचे षटक सुरू असताना चौथ्या चेंडूवर रीझा हेंड्रिक्सची विकेट पडली. त्याचा कॅच मोहम्मद वसीम ज्युनियरने घेतला. विकेटचा आनंद व्यक्त करण्यासाठी त्याने कॅच घेतल्यानंतर जोरात हावेत फेकला आणि तो सर्फराज अहमदच्या डोक्याला लागला. दुखापत खूप गंभीर होती आणि तो मैदाना बाहेर गेला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

US H1B Visa: अमेरिकेचा H1B झटका! १ लाख ३ हजार डॉलर अतिरिक्त शुल्कामुळे नोकऱ्या परदेशात जाण्याची भीती

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Birth Death Registration Rules : जन्म-मृत्यू नोंदीला दोन वर्षे विलंब, तर न्यायालयाचे दार ठोठावे लागणार; केंद्राचे नवे कडक नियम लागू, गैरप्रकार रोखण्यासाठी पाऊल

SCROLL FOR NEXT