Sarfaraz Khan Sunil Gavaskar Esakal
Cricket

Sarfaraz Khan : माझ्या वतीने गावसकर सरांची माफी मागा... सर्फराज खान असं का म्हणाला?

अनिरुद्ध संकपाळ

Sarfaraz Khan Apologies To Sunil Gavaskar : मुंबईकडून धावांचा पाऊस पाडल्यानंतर अखेर सर्फराज खानला इंग्लंडविरूद्धच्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत खेळण्याची संधी मिळाली होती. पदार्पणाच्या या मालिकेत सर्फराजने दमदार फलंदाजी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. त्याने तीन कसोटी सामन्यात तीन अर्धशतकी खेळी केल्या. मालिकेतील शेवटच्या कसोटीत तो 56 धावा करून बाद झाला होता.

सुनिल गावसकर सर्फराजवर भडके होते

धरमशाला कसोटीत चहापानानंतर सर्फराज खान एक खराब फटका मारून बाद झाला होता. त्यावेळी सुनिल गावसकर समालोचन करत होते. त्यांना सर्फराजचे खराब फटका खेळून बाद होणे आवडले नाही.

त्यांनी समालोचन करताना म्हणाले की, 'डॉन ब्रॅडमनने मला एकदा सांगितले होते की ज्यावेळी चेंडूचा सामना करतो त्यावेळी मी जरी 200 धावांवर खेळत असलो तरी मी तो चेंडू शुन्यावर असल्यासारखाच खेळतो. दुसरीकडे सर्फराज हा या प्रकारे खराब फटका मारून बाद होतोय.'

सर्फराज खानने मागितली माफी?

मिळालेल्या माहितीनुसार सर्फराज खानने सुनिल गावसकरांची माफी मागितली आहे. युएईचे वर्तमानपत्र द नॅशनल न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार दुबईचे व्यावसायिक श्याम भाटिया यांनी सर्फराज खान आणि सुनिल गावसकर यांची भेट घडवून आणली होती.

श्याम भाटिया म्हणाले की, 'सर्फराज आणि सुनिल गावसकर हे 45 मिनिटांपर्यंत चर्चा करत होते. त्यानंतर सर्फराज टी ब्रेकनंतर खराभ फटका मारून बाद झाला. सुनिल गावसकर सर्फराजवर जाम भडकले होते. दुसऱ्या दिवशी सर्फराज खान माझ्या सोबत होता त्याने मला सांगितले की सर कृपा करून माझ्या वतीने सुनिल गावसकर सरांची माफी मागा. माझ्याकूडन चूक झाली. मी ही चूक परत करणार नाही.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

SCROLL FOR NEXT