Shafali Verma INDW vs RSAW esakal
Cricket

Shafali Varma : कशी होणार फायनल... टीम इंडियाच्या मुलींनी दाखवली झलक, शफालीनं ठोकलं पहिलं कसोटी शतक

INDW vs RSAW : शफाली वर्मा अन् स्मृती मानधनाची दमदार खेळी 250 धावांची दिली सलामी

अनिरुद्ध संकपाळ

Shafali Varma INDW vs RSAW : भारतीय महिला क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघात आजपासून एकमेव कसोटी सामना सुरू झाला. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारताने प्रथम फलंदाजी करताना दमदार सुरूवात केली. विशेष म्हणजे टी 20 वर्ल्डकप 2024 च्या फायनलमध्ये भारतीय पुरूष संघ दक्षिण आफ्रिकेशी भिडणार आहे. त्यापूर्वी एक दिवस आधी ही कसोटी सुरू झाली आहे. भारतीय महिला संघाने फायनल कशी खेळायची याची जणू झलक दाखवून दिली.

भारतीय सलामी जोडी शफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांनी दमदार सलामी दिली. शफाली वर्माने कसोटी कारकिर्दीतली आपले पहिले शतक ठोकले. तर स्मृतीने देखील वनडे मालिकेतील फॉर्म कसोटीतही कायम ठेवत शतकी मजल मारली. शफाली वर्मान 113 चेंडूत शतक ठोकलं. यात 15 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघात झालेल्या वनडे मालिकेत भारताने आफ्रिकेला 3 - 0 असा व्हाईट वॉश दिला. यात सलामीवीर आणि संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाचा सिंहाचा वाटा होता. तिने पहिल्या दोन सामन्यात शतकी खेळी केली होती. तर तिसऱ्या सामन्यात तिचे शतक थोडक्यात हुकलं होतं. ती 91 धावा करून बाद झाली.

जर स्मृतीचे शतकांची हॅट्ट्रिक करण्याचे स्वप्न पूर्ण झालं नाही तरी तिने कसोटी सामन्यात याची कसर भरून काढली. तिने शतकच नाही तर दीडशतकी मजल मारून आपण जबरदस्त फॉर्ममध्ये असल्याचं दाखवून दिलं.

तिची सलामीची जोडीदार शफला वर्माला मात्र वनडे मालिकेत फारशी चकमदार कामगिरी करता आली नव्हती. परंतु तिने कसोटी सामन्यात याची कसर भरून काढली तिने 113 चेंडूत शतकी खेळी केली. तिचे हे कसोटी क्रिकेटमधील पहिलेच शतक ठरले. स्मृती आणि शफालीने कसोटीच्या पहिल्या दिवशी 51 षटकात 283 धावांची दणदणीत सलामी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv News: अतिवृष्टीमुळे नुकसान होऊन व कर्जबाजारीपणामुळे भूम तालुक्यातील शेतकऱ्याने संपवले जीवन

Ladki Bahin yojana: बहिणींसाठी ‘ई-केवायसी’ रुसली; ‘कनेक्टिव्हिटी’सह संकेतस्थळ वारंवार बंद होत असल्याने मनस्ताप

IND vs PAK : B@#@# मुझे आंख दिखाती है! पाकिस्तानच्या फिरकीपटूने 'डोळे वटारले', हरमनप्रीत कौरने बघा काय केले? Video Viral

ठाण्यात सरकारी जागेवर ३ इमारती बांधल्या, बिल्डरकडून ११२ फ्लॅटधारकांची कोट्यवधींची फसवणूक

अरे वाह! 'या' मराठी अभिनेत्रीचा झाला साखरपुडा, नवरा सुद्धा आहे 'या' मालिकेतील अभिनेता, सोशल मीडियावर फोटोची चर्चा

SCROLL FOR NEXT