IPL 2024 Shubman Gill  sakal
Cricket

IPL 2024 Shubman Gill : अजून १५ धावा कमी पडल्या : गिल,विजय मिळाला पण निव्वळ सरासरी उंचावता आली नाही!

आम्ही द्विशतकी सलामी देऊन मोठ्या धावसंख्येची भलीमोठी पायाभरणी केली असली तरी आम्हाला अजून १५ धावा कमी पडल्या, त्यामुळे धावांची सरासरी अधिक प्रमाणात उंचावता आली नाही, अशी खंत गुजरातचा कर्णधार शुभमन गिलने चेन्नईवरील विजयानंतर व्यक्त केली.

सकाळ वृत्तसेवा

अहमदाबाद : आम्ही द्विशतकी सलामी देऊन मोठ्या धावसंख्येची भलीमोठी पायाभरणी केली असली तरी आम्हाला अजून १५ धावा कमी पडल्या, त्यामुळे धावांची सरासरी अधिक प्रमाणात उंचावता आली नाही, अशी खंत गुजरातचा कर्णधार शुभमन गिलने चेन्नईवरील विजयानंतर व्यक्त केली.

शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांनी शतके करत १७.२ षटकांत २१० धावांची सलामी दिली. त्यानंतरही गुजरात संघाला २० षटकांपर्यंत २३१ धावा करता आल्या तरीही हा सामना त्यांना ३५ धावांनीच जिंकता आला, त्यामुळे त्यांच्या निव्वळ सरासरीत मोठा फरक पडला नाही. त्यांची निव्वळ सरासरी अजून उणे (-१.०६३) अशी आहे आणि ते आठव्या स्थानावर आहेत.

खरे सांगायचे तर आम्ही २५० धावापर्यंत मजल मारायला हवी होती. अखेरच्या दोन-तीन षटकांत चेन्नईच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. त्यामुळे आमच्या १० ते १५ धावा कमी झाल्या. विजयाच्या दृष्टिकोनातून नव्हे तर निव्वळ सरासरी उंचावण्यासाठी या धावा आम्हाला कमी पडल्या, असे गिलने सांगितले.

गिल अनुपस्थित, तरीही दंड

चेन्नईविरुद्धच्या या सामन्यात निर्धारित वेळेत षटके पूर्ण न केल्याबद्दल गिलला २४ लाखांचा दंड करण्यात आला. आणि संघातील इतर खेळाडूंना सहा लाख किंवा सामना मानधनातील २५ टक्के यापैकी कमी असलेल्या रकमेचा दंड करण्यात आला. वास्तविक पायाचे स्नायू आखडल्यामुळे गिल डावाच्या सुरुवातीसच मैदानाबाहेर गेला आणि त्याच्याऐवजी राहुल तेवटियाने गुजरात संघाचे नेतृत्व केले.

साई सुदर्शनबरोबरच्या द्विशतकी सलामीबाबत बोलताना गिल म्हणाला, आम्ही दोघांनी बिनधास्त फलंदाजी केली. कोणतेही दडपण ठेवले नाही. जे चेंडू मारण्याचे होते ते स्टेडियममध्ये मारत होतो. चांगली लय मिळाली ती आम्ही वैयक्तिक शतकांपर्यंत कायम ठेवली.

या पराभवामुळे प्लेऑफ गाठण्याच्या आमच्या आशा कठीण झाल्या आहेत, हे चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने मान्य केले. आम्ही क्षेत्ररक्षणात चुका केल्या, त्यामुळे १० ते १५ धावा अधिक दिल्या. शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांनी फारच अफलातून फलंदाजी केली. त्यांच्याकडून होणारा धावांचा ओघ अडवणे सोपे जात नव्हते, असे ऋतुराज म्हणाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : विठ्ठलवाडी मंदिरात भाविकांची गर्दी

Ghat Road Travel: पावसाळ्यात घाटातील प्रवास सुखकर बनवण्यासाठी कोणती काळजी अन् खबरदारी घ्यावी?

Video : ‘एक उडी’... अन् सगळं संपलं! स्टंटबाजी करताना इमारतीवरून पडला मुलगा, थरकाप उडवणाऱ्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ व्हायरल..

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

SCROLL FOR NEXT