Binura Fernando has been hospitalized due to a chest infection sakal
Cricket

SL vs IND : 72 तासांत 3 गोलंदाज संघाबाहेर! एकतर थेट हॉस्पिटलमध्ये; बोर्डाने केली बदलीची घोषणा

भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिका सुरू होण्यास अवघे 12 तास उरले आहेत, मात्र त्याआधीच यजमान संघाच्या विकेट एकामागून एक पडत आहेत.

Kiran Mahanavar

India vs Sri Lanka 1st T20I : भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिका सुरू होण्यास अवघे 12 तास उरले आहेत, मात्र त्याआधीच यजमान संघाच्या विकेट एकामागून एक पडत आहेत. खरं तर, गेल्या 72 तासांत श्रीलंका संघांचे 3 खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर गेले आहेत.

24 जुलै रोजी वेगवान गोलंदाज दुष्मंथा चमीरा, दुसऱ्याच दिवशी वेगवान गोलंदाज नुआन तुषाराला सरावाच्या वेळी दुखापत झाली आणि त्यांना संघाबाहेर जावे लागले. आता संघाचा आणखी एक वेगवान गोलंदाज बिनुरा फर्नांडो आजारी असल्यामुळे संघातून बाहेर गेला आहे.

श्रीलंका क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावर अधिकृत माहिती दिली आणि सांगितले की, 'बिनुरा फर्नांडो आजारी असल्यामुळे त्याला थेट रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रमेश मेंडिसचा स्टँडबाय खेळाडू म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेपूर्वी श्रीलंकेच्या संघाला 3 मोठे झटके बसले आहेत.

श्रीलंकेचा संघ - दिनेश चंडीमल, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), पथुम निसांका, कुसल परेरा, चारिथ असलंका (कर्णधार), वानिंदू हसरंगा, कामिंदू मेंडिस, दासुन शनाका, चामिंडू विक्रमसिंघे, बिनुरा फर्नांडो (रमेश मेंडिस, डसून फर्नांडो, रमेश मेंडिस) मधुशंका, मथिशा पाथीराना, महेश थेक्षाना, दुनिथ वेललागे.

टी-20 मालिकेचे वेळापत्रक

श्रीलंका दौऱ्यावरील टी-20 मालिकेतील पहिला सामना 27 जुलै रोजी पल्लेकेले येथे होणार आहे. दुसरा टी-20 28 जुलै आणि तिसरा 30 जुलै रोजी होणार आहे. यानंतर 2 ऑगस्टपासून 3 सामन्यांची एकदिवसीय मालिकाही होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी आज निघणार विनापरवाना दुचाकी रॅली! सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांनीच नाकारला पोलिसांचा नियम; शांतता कमिटीचे सदस्यच आयोजक

Glenn Maxwell ने बनवली भारत, ऑस्ट्रेलिया अन् इंग्लंडची मिळून ODI XI; पण एकाही इंग्लिश खेळाडूला स्थान नाही, 'या' भारतीयांची निवड

Maharashtra Floods : पाचच जिल्ह्यांचे पंचनामे अहवाल अंतिम, दिवाळीपूर्वी मदतीवर सावट; ४८ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान

जनसंपर्क, भ्रमंती आणि संस्कृतीचे दर्शन

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 15 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT