Sourav Ganguly BCCI Team India Head Coach  esakal
Cricket

Sourav Ganguly : ... म्हणून कोचची योग्य निवड महत्त्वाची! गांगुलीचं ते ट्विट म्हणजे बीसीसीआयला 'गंभीर' इशारा?

Sourav Ganguly BCCI : टीम इंडियाचा प्रशिक्षक निवडीबाबत माजी अध्यक्षानं दिला मोलाचा सल्ला

अनिरुद्ध संकपाळ

Sourav Ganguly Gautam Gambhir : राहुल द्रविडनंतर भारतीय संघाचा हेड कोच कोण होणार याबाबत जोरदार चर्चा क्रिकेट वर्तुळात होत आहे. आयपीएलदरम्यान अनेक नावं भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी चर्चेत होती. अखेर ही चर्चा कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटॉर गौतम गंभीरवर येऊन स्थिरावताना दिसत आहे. बीसीसीआयने देखील गंभीरचं नाव निश्चित केल्याची चर्चा आहे.

मात्र याचवेळी बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सैरव गांगुलीने एक क्रिप्टिक सोशल मीडिया पोस्ट करत खळबळ उडवून दिली. त्याने एखाद्या खेळाडूच्या आयुष्यात कोचचा काय रोल असतो याबद्दल या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

सौरव गांगुलीने आपल्या एक्स अकाऊंटवर पोस्ट केली की, 'एखाद्या कोचचं खेळाडूच्या आयुष्यात खूप मोठं महत्व असतं. त्याचे मार्गदर्शन, सातत्यपूर्ण सराव करून घेण्यानं एखाद्याचं मैदानावरील अन् मैदानाबाहेरील आयुष्य आणि भविष्य घडतं. त्यामुळं कोच आणि संस्थेची योग्य निवड करणं खूप गरजेचं असतं.'

सैरव गांगुलीने बीसीसीआयमध्ये अनेक पदं सांभाळली आहेत. याचबरोबर त्यानं कधी भारतीय संघाचा प्रशिक्षक होण्याची इच्छा दर्शवली नाही. त्याचे सहकारी राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी मात्र कोचिंगचं काम केलं. सौरव गांगुली आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा क्रिकेट संचालक आहे.

आयपीएलच्या 2011 च्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सने सैरव गांगुलीऐवजी गौतम गंभीरकडं केकेआरचं नेतृत्व दिलं होतं. मात्र त्यानंतर गंभीर अन् गांगुलीमध्ये कोणतं वितुष्ट आल्याचं ऐकण्यात आलं नव्हतं. परंतु आता गांगुलीचं हे ट्विट एकप्रकारे बीसीसीआयला वॉर्निंग असल्याचं जाणकार म्हणत आहेत. बीसीसीआय गौतम गंभीरला हेड कोच नेमण्याच्या तयारीत आहे.

(Cricket News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NavIC: आता भारतीयांना रस्ता गुगल मॅप्स नाही, तर'नाविक' सांगणार; सरकारची नेमकी योजना काय?

Narayangaon News : पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी; एक किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

Mahadev Jankar : सरकार शक्तिपीठ महामार्गाला तरतूद करते, मात्र निवडणूक आश्वासनातील कर्जमाफीला तरतूद करत नाही

JDU Expelled Leaders: मोठी बातमी! निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षाकडून ११ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, कारण काय?

ICC Womens World Cup 2025 : ठरलं! भारत सेमीफायनलमध्ये अपराजित ऑस्ट्रेलियाशी भिडणार; द. आफ्रिकेला हरवत कांगारूं पाँइंट्स टेबलमध्ये अव्वल...

SCROLL FOR NEXT