SL vs AFG
SL vs AFG  Esakal
क्रिकेट

SL vs AFG : अफगाणिस्तानचा शेवट गोड; अखेरच्या लढतीत विजय

सकाळ वृत्तसेवा

Sri Lanka Vs Afghanistan T20 Series :

दाम्बुला, ता. २२ पाहुण्या अफगाणिस्तान क्रिकेट संघाने गुरुवारी येथे झालेल्या अखेरच्या लढतीत श्रीलंकेवर तीन धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. अफगाणिस्तानने या लढतीत विजय मिळवला असला, तरी यजमान श्रीलंकन संघाने तीन टी-२० सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली. ७० धावांची खेळी साकारणारा रहमानुल्ला गुरबाज सामनावीर ठरला.

तसेच या मालिकेत १०२ धावा फटकावणारा व चार विकेट घेणारा श्रीलंकेचा कर्णधार वनिंदू हसरंगा याची मालिकावीर म्हणून निवड करण्यात आली.

अफगाणिस्तानकडून श्रीलंकेसमोर २१० धावांचे आव्हान ठेवण्यात आले. पाथुम निस्सांका याने ६० धावांची खेळी केली; पण तो निवृत्त झाला. कमिंदू मेंडिस याने श्रीलंकेच्या विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अखेरच्या षटकात त्यांच्यासमोर विजयासाठी १९ धावांचे लक्ष्य होते. अफगाणिस्ताकडून वफादार मोमांड याच्याकडे चेंडू सोपवण्यात आला.

मेंडिसने पहिल्या तीन चेंडूंवर दोन चौकारांसह आठ धावा वसूल केल्या. वफादार याने चौथा चेंडू फुलटॉस टाकला. हा चेंडू कमरेवर टाकला गेला, हे रिप्लेमध्ये दिसले. मात्र पंचांकडून नो बॉल देण्यात आला नाही. या चेंडूवर एकही धाव घेण्यात आली नाही. पंचांवर कर्णधार हसरंगा याने कमालीची नाराजी व्यक्त केली.

मेंडिसने अखेरच्या चेंडूवर षटकार मारला; पण तो श्रीलंकन संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. अखेरच्या तीन चेंडूंवर विजयासाठी ११ धावांची आवश्‍यकता होती. श्रीलंकेला सात धावाच करता आल्या.

त्याआधी प्रथम फलंदाजी करणाऱ्या अफगाणिस्तानने हझरतुल्ला झझाई (४५ धावा), रहमानुल्ला गुरबाज (७० धावा), अझमातुल्ला ओमरझाई (३१ धावा) यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर २० षटकांत ५ बाद २०९ धावा फटकावल्या. दरम्यान, श्रीलंकेने कसोटी मालिका १-० अशी, एकदिवसीय मालिका ३-० अशी आणि आता टी-२० मालिका २-१ अशी आपल्या नावे केली.

संक्षिप्त धावफलक ः अफगाणिस्तान २० षटकांत ५ बाद २०९ धावा (हझरतुल्ला झझाई ४५, रहमानुल्ला गुरबाज ७०, अझमातुल्ला ओमरझाई ३१, अकिला धनंजया २/३७) विजयी वि. श्रीलंका २० षटकांत ६ बाद २०६ धावा (पाथुम निस्सांका ६०, कमिंदू मेंडिस नाबाद ६५, मोहम्मद नबी २/३५).

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT