T20 Cricket esakal
Cricket

T20 Cricket : कॅच घ्यायचाच नव्हता मात्र जिवावर बेतलं अन्... टी 20 सामन्यातील या व्हिडिओची सगळीकडं चर्चा

Cricket Viral Video : इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या टी 20 ब्लास्ट लीग स्पर्धेतील एक अजब कॅच सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करतोय.

अनिरुद्ध संकपाळ

Paul Coughlin Take Stunning Catch : जागतिक क्रिकेटमध्ये सध्या टी 20 वर्ल्डकपचाच फिव्हर दिसून येत आहे. अमेरिकेत आणि वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या यंदाच्या टी 20 वर्ल्डकपमधील ग्रु स्टेजचे सामने आता जवळपास संपले आहेत. सर्वांना सुपर 8 फेरीची उत्सुकता लागून राहिली आहे.

दरम्यान, इंग्लंडमध्ये देखील टी 20 ब्लास्ट नावाची एक स्थानिक टी 20 लीग सुरू आहे. या टी 20 लीगमधील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत एक गोलंदाज बॉलर्स बॅक शॉट चुकवण्याच्या प्रयत्नात असं काही करतो की समालोचकापासून त्याच्याच संघातील खेळाडू देखील आश्चर्यचकीत होतात.

सोशल मीडियावर पॉलच्या या भन्नाट कॅचची चर्चा सुरू आहे. इंग्लंडमधील टी 20 ब्लास्ट स्पर्धेत डरहम आणि लंकाशायर यांच्यातील सामन्यात ही घटना घडली. या सामन्यात पॉल कफलिन बॉलिंग करत होता. स्ट्राईकवर असलेला फलंदाज मॅथ्यू हर्स्टने पॉलने टाकलेला बॉल त्याच्या दिशेने टोलवला. फटका तसा वेगातच होता. बॉल टाकल्यानंतर फॉलो थ्रोमध्ये पॉल स्वतःला सावरत असतानाच बॉल वेगाने त्याच्या दिशेने येत होता. बॉल आता पॉलच्या डोक्यावर लागणार इतक्यात पॉलने बॉलपासून वाचण्यासाठी आपला हात पुढे केला अन् बॉल त्याच्या हातात येऊ बसला.

पॉलला कॅच घ्यायचा नव्हता तर त्याला स्वतःचं डोकं वाचवायचं होतं. मात्र झालं वेगळंच पॉलच्या या भन्नाट कॅचनं मॅथ्यूज बाद झाला. यावर समालोचकांचाच काय पॉलच्या सहकाऱ्यांना देखील विश्वास बसला नाही.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर डरहम आणि लँकेशायर यांच्यात खेळला गेलेला सामना खूपच रोमांचक झाला. डरहमने हा सामना 2 धावांनी जिंकला. या सामन्यात डरहम संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 3 गडी गमावून 218 धावा केल्या. डरहमसाठी ग्रॅहम क्लार्कने 57 चेंडूत 8 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 87 धावांची शानदार खेळी केली.

दुसरीकडे लँकेशायर संघाला 219 धावांचे लक्ष्य गाठता आले नाही. लँकेशायरला सामन्यात डरहमच्या धावसंख्येपेक्षा 2 धावा कमी पडल्या. या सामन्यात, कॅलम पार्किन्सनने डरहमसाठी अप्रतिम गोलंदाजी करत 4 षटकात 31 धावा देत 3 मोठ्या विकेट घेतल्या. त्याचा डरहमच्या विजयात त्याचा मोलाचा वाटा होता.

(Cricket News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT