T20 World Cup team india Sanju Samson News Marathi sakal
Cricket

Team India squad T20 WC24 : विकेटकीपर म्हणून संजू सॅमसन बनला निवडकर्त्यांची पहिली पसंती; कोणाचा पत्ता झाला कट?

T20 World Cup Team India Squad : टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये भारतीय संघाच्या निवडीशी संबंधित मोठी बातमी समोर येत आहे.

Kiran Mahanavar

T20 World Cup Team India Squad: टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये भारतीय संघाच्या निवडीशी संबंधित मोठी बातमी समोर येत आहे. रिपोर्ट्सनुसार, टीम इंडियामध्ये विकेटकीपर म्हणून संजू सॅमसनची जागा पक्की झाली आहे. अशा स्थितीत ऋषभ पंत आणि केएल राहुलपैकी एकाला बाहेर बसावे लागू शकते.

संजू सॅमसनने आयपीएल 2024 मध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. या हंगामात सर्वाधिक धावा करणारा तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 9 सामन्यात 161.08 च्या स्ट्राईक रेटने 385 धावा केल्या आहेत. तर केएल राहुलने 9 सामन्यात 144-27 च्या स्ट्राईक रेटने 378 धावा केल्या आहेत.

ईएसपीएन क्रिकइन्फोच्या अहवालानुसार, संजू सॅमसनची पहिली पसंती यष्टिरक्षक म्हणून निवड केली जाईल, कारण तो फिरकी खूप चांगला खेळतो. त्याचबरोबर केएल राहुल आणि ऋषभ पंत यांच्यामध्ये फक्त एकच खेळाडू निवडला जाईल. मधल्या फळीत खेळताना तो धावा करत असल्याने संजू सॅमसनचा दावा मजबूत आहे. तर केएल राहुलने टॉप ऑर्डरमध्ये धावा केल्या आहेत आणि या स्थानावर विराट कोहली, रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांचे स्थान आधीच निश्चित झाले आहे.

लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात संजू सॅमसनने तुफानी खेळी करत आपली दावेदारी मांडली आहे. त्याने 33 चेंडूत 7 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 71 धावांची खेळी केली. ऋषभ पंतनेही अनेक शानदार खेळी खेळल्या आहेत पण त्याची निवड अद्याप निश्चित झालेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT