BCCI Announces India Squad for T20 World Cup 2024 Marathi sakal
Cricket

India Squad T20 World Cup 2024 : टीम इंडियाची घोषणा! वर्ल्ड कप जिंकण्याची जबाबदारी 'या' मावळ्यांच्या खांद्यावर, जाणून घ्या संपूर्ण संघ

BCCI Announces India Squad for T20 World Cup 2024 : अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट नियामक मंडळने टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी टीम इंडियाची घोषणा केली आहे.

Kiran Mahanavar

BCCI Announces India Squad for T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्ड कप 2024 सुरू होण्यासाठी केवळ एक महिना राहिला आहे. त्याआधी अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट नियामक मंडळने टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियामध्ये काही नवीन खेळाडूंनाही स्थान मिळाले आहे. तर हार्दिक पांड्या उपकर्णधार म्हणून काम करताना दिसणार आहे.

संघात दोन यष्टिरक्षकांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये ऋषभ पंत आणि संजू सॅमसन आहे. त्याचबरोबर केएल राहुलला संघातून वगळण्यात आले आहे. राहुल गेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाचा भाग होता.

टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ (India Squad for T20 World Cup 2024):

रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

राखीव : शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद, आवेश खान

नुकतेच टीम इंडियाचा भाग असलेले तीन मोठे चेहरे केएल राहुल शिवाय रिंकू सिंग आणि शुभमन गिल यांना भारतीय संघातून वगळण्यात आले आहेत. मात्र, बीसीसीआयने रिंकू आणि शुभमनला राखीव ठेवले आहे. रिंकूपेक्षा शिवम दुबेला प्राधान्य देण्यात आले आहे.

हार्दिकची निवड झाली तर शिवम-रिंकूपैकी एकालाच संधी मिळेल, अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. त्याचवेळी यशस्वी आणि शुभमन या दोघांपैकी एकाला संधी द्यावी लागली. निवडकर्त्यांनी शुभमनपेक्षा यशस्वीला प्राधान्य दिले आहे.

यष्टिरक्षक म्हणून पंत आणि सॅमसन

निवड समितीने ऋषभ पंत आणि संजू सॅमसन यांना यष्टिरक्षक म्हणून संधी दिली आहे. कार अपघातानंतर पुनरागमन करत पंतने या आयपीएलमध्ये उत्कृष्ट फॉर्म दाखवला आहे. त्याचवेळी, सॅमसनच्या कामगिरीमुळे राजस्थान संघ आयपीएल 2024 च्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. यासह राहुल, जितेश आणि इशान यांसारख्या यष्टीरक्षकांमधील शर्यतीबाबतच्या अटकळांनाही पूर्णविराम लागला.

टीम इंडियाचे टी-20 वर्ल्ड कपचे वेळापत्रक - (T20 World Cup 2024 Schedule)

  • 5 जून - टीम इंडिया विरुद्ध आयर्लंड

  • 9 जून - टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान

  • 12 जून - टीम इंडिया विरुद्ध यूएएसए

  • 15 जून - टीम इंडिया विरुद्ध कॅनडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Chairman : माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं! , विरोधकांच्या आक्षेपावर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता...

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Mumbai News: मुंबईत पावसामुळे रस्त्यांची दैना, खड्ड्यांची आकडेवारी समोर, पण पालिकेचा वेगळाच दावा

Cyber Fraud : जळगावात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार: 'सीबीआय'च्या नावाने निवृत्त डॉक्टरला ३१ लाखांना गंडवले

Top 5 Government Schemes: सरकारच्या तिजोरीतून तुमच्यासाठी खास! ‘पीएम किसान’सारख्या 'या' 5 योजना ठरतील तुमचं आर्थिक कवच

SCROLL FOR NEXT