T20 WC 24 Team India Squad News Marathi sakal
Cricket

T20 WC 24 Team India Squad : हार्दिक पांड्याला मिळणार का संघात जागा अन्‌ दुसरा यष्टिरक्षक कोण? आज सगळे प्रश्न सुटणार

Team India Squad T20 World Cup 2024 : भारतीय पुरुष क्रिकेट निवड समिती आज (ता. ३०) बीसीसीआयचे सचिव जय शहा यांना अहमदाबादमध्ये भेटणार आहे.

Kiran Mahanavar

Team India Squad T20 World Cup 2024 : भारतीय पुरुष क्रिकेट निवड समिती आज (ता. ३०) बीसीसीआयचे सचिव जय शहा यांना अहमदाबादमध्ये भेटणार आहे. या बैठकीत वेस्ट इंडीज व अमेरिका येथे होणाऱ्या टी-२० विश्‍वकरंडकासाठी भारतीय संघाची निवड करण्यात येणार आहे. संघ निवड झाल्यानंतर याबाबतची घोषणा बुधवारीही करण्यात येऊ शकते.

निवड समितीच्या बैठकीत दोन मुद्दे महत्त्वाचे ठरणार आहेत. आयपीएलमध्ये सुमार खेळ करीत असलेल्या हार्दिक पंड्याचे भारतीय संघातील स्थान व दुसरा यष्टिरक्षण कोण असणार, या दोन बाबींवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात येण्याची शक्यता आहे.

संजू सॅमसन यंदाच्या आयपीएल मोसमात राजस्थानचा कर्णधार व फलंदाज अशा दुहेरी भूमिकेत छान कामगिरी करीत आहे. के. एल. राहुलपेक्षा त्यांचा फलंदाजी स्ट्राईक रेटही चांगला आहे, पण फक्त एका मोसमातील सातत्यपूर्ण खेळाच्या जोरावर त्याला भारतीय संघात स्थान देण्यात येईल का, हा प्रश्‍नही याप्रसंगी निर्माण झाला आहे. रिषभ पंतसह कोणता यष्टिरक्षक टी-२० विश्‍वकरंडकाचे तिकीट मिळवणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

याशिवाय जितेश शर्मा, ध्रुव जुरेल या यष्टिरक्षक फलंदाजांचाही पर्याय असणार आहे. मधल्या फळीत तिलक वर्माला संधी मिळतेय का, हे पाहणे रंजक ठरेल. तो पार्टटाईम फिरकी गोलंदाजीही करतो. तसेच मध्यमगती वेगवान गोलंदाज संदीप शर्मा याच्या नावावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : एकादशीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते; पहाटे 2.30 वाजता होणार महापूजा

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

SCROLL FOR NEXT