Team India Squad T20 World Cup 2024 Rishabh Pant may replace Hardik Pandya as the Indian vice-captain News Marathi sakal
Cricket

Team India Squad T20 WC : संघाची घोषणा होण्याआधी मोठी अपडेट; टीम इंडियाचा उपकर्णधार बदलणार... पांड्याची जागा घेणार 'हा' खेळाडू?

Team India Squad T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्ड कप 2024 चा थरार 1 जूनपासून वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत रंगणार आहे. 20 संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेसाठी लवकरच टीम इंडियाची घोषणा केली जाऊ शकते.

Kiran Mahanavar

Team India Squad T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्ड कप 2024 चा थरार 1 जूनपासून वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत रंगणार आहे. 20 संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेसाठी लवकरच टीम इंडियाची घोषणा केली जाऊ शकते. या सगळ्या दरम्यान संघ निवड बैठकीपूर्वी एक मोठी बातमी समोर येत आहे. या बैठकीत संघाच्या उपकर्णधाराबाबतही मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो.

टीम इंडियाचा उपकर्णधार बदलणार?

क्रिकबझच्या वृत्तानुसार, टी-20 वर्ल्ड कपसाठी होणाऱ्या संघ निवड बैठकीत उपकर्णधाराच्या नावावर चर्चा होऊ शकते. सध्या हार्दिक पांड्या ही जबाबदारी सांभाळत आहे. मात्र या बैठकीत भारतीय संघाच्या उपकर्णधारपदी ऋषभ पंतची पुनर्नियुक्ती करण्यावर विचार केला जाऊ शकतो. ऋषभ पंतने यापूर्वीही टीम इंडियाच्या उपकर्णधाराची भूमिका निभावली आहे. पण डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या कार अपघातानंतर तो टीम इंडियासाठी खेळलेला नाही.

ऋषभ पंत सध्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत आहे. लीगच्या या हंगामात त्याची कामगिरी चांगली राहिली आहे. अशा स्थितीत जूनमध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपसाठी तो भारताचा पहिला पसंतीचा यष्टिरक्षक असेल. त्याचबरोबर त्याने कर्णधार म्हणूनही आपली छाप सोडली आहे. त्याने एकदा भारतीय संघाचे कर्णधारपदही भूषवले आहे. जून 2022 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत पंतने भारतीय संघाचे नेतृत्व केले होते.

हार्दिक पांड्यासाठी आयपीएलचा सध्याचा हंगाम काही खास राहिला नाही. त्याला 9 सामन्यात केवळ 197 धावा करता आल्या आणि केवळ 4 विकेट्स घेतल्या. त्याच वेळी, त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने 9 पैकी 6 सामने गमावले आहेत.

अशा स्थितीत उपकर्णधारपदाची जबाबदारी टी-20 वर्ल्ड कपपूर्वी विचारात घेतली जाऊ शकते. पण भारताचा कर्णधार म्हणून पांड्याच्या क्षमतेकडे दुर्लक्ष करता येणार नाही. गेल्या वर्षी झालेल्या वर्ल्ड कपसाठी त्याला संघाचा उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: तुमचा अभिमान! शुभमन गिल पराभवानंतर काय म्हणाला? सामना नेमका कुठे फिरला हे सांगितलं, जसप्रीतबाबत...

Video: सर्वच सीमा ओलांडल्या! फेमस होण्यासाठी बाईकवर जोडप्याचं नको ते कृत्य, लोकांनी व्हिडिओ बनवून व्हायरल केला

IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराज दुर्दैवी पद्धतीने बाद झाला, रवींद्र जडेजा हतबल दिसला; इंग्लंड तिथेच जिंकला Video

Mhada Lottery: मुंबईकरांना म्हाडाकडून आनंदवार्ता! ५ हजारहून अधिक घरांची लॉटरी जाहीर; 'असा' करा अर्ज

ENG vs IND, 3rd Test: जडेजा लढला, पण इंग्लंडने लॉर्ड्स कसोटी जिंकली! १९३ धावा करतानाही भारताची उडाली भंबेरी

SCROLL FOR NEXT