Team India T20 World Cup Squad Updates News Marathi sakal
Cricket

T20 World Cup साठी टीम इंडियाच्या निवडीबाबत मोठी अपडेट! 'या' दिवशी होणार संघाची घोषणा, BCCI ने बोलावली तातडीची बैठक

Team India T20 World Cup Squad Updates : आता सध्या भारतात आयपीएल 2024 चा थरार सुरू आहे पण त्यासोबतच टी20 वर्ल्ड कप 2024 चे काउंटडाऊन देखील सुरु झाले आहे.

Kiran Mahanavar

Team India T20 World Cup Squad Updates : आता सध्या भारतात आयपीएल 2024 चा थरार सुरू आहे पण त्यासोबतच टी20 वर्ल्ड कप 2024 चे काउंटडाऊन देखील सुरु झाले आहे. यासाठी लवकरच टीम इंडियाची घोषणा होणार आहे. सर्व देश 1 मे पर्यंत टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी त्यांचे संघ जाहीर करू शकतात. आता बीसीसीआयही टीम इंडियाची घोषणा करण्याच्या तयारीत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, टीम इंडियाच्या घोषणेबाबत बीसीसीआय 27 किंवा 28 एप्रिलला बैठक घेणार आहे. ही बैठक दिल्लीत होऊ शकते. कारण यादरम्यान मुंबई इंडियन्सचा सामनाही दिल्लीत होणार आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा दिल्लीतच उपस्थित राहणार आहे.

या 10 खेळाडूंची निवड निश्चित

आता प्रश्न असा आहे की, टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियामध्ये कोणते खेळाडू निवडले जाऊ शकतात? तर आम्ही तुम्हाला सांगतो की किमान 10 खेळाडूंची नावे निश्चित केली आहेत, ज्यांची निवड केली जाऊ शकते.

या 10 खेळाडूंमध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, शुभमन गिल, केएल राहुल, कुलदीप यादन, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांची नावे आहेत.

हार्दिक पांड्याबाबत सस्पेन्स

हार्दिक पांड्या पहिल्या 10 नावांमध्ये नाही कारण त्याच्याबद्दल कोणतीही अचूक माहिती उपलब्ध नाही. हार्दिकने आयपीएलमध्ये गोलंदाजी केली तरच त्याचा विचार केला जाऊ शकतो, असे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT