Thomas Badminton Cup sakal
Cricket

Thomas Badminton Cup : गतविजेत्या भारतीय संघांचे आव्हान संपुष्टात ; थॉमस व उबेर करंडक बॅडमिंटन

गतविजेत्या भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाला थॉमस बॅडमिंटन करंडकातील उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत पराभवाचा धक्का बसला. बलाढ्य चीनच्या पुरुष संघाने भारतीय संघाला ३-१ असे सहज पराभूत केले आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला. उबेर करंडकातही भारतीय महिला संघाला निराशेला सामोरे जावे लागले.

सकाळ वृत्तसेवा

चेंगडू (चीन) : गतविजेत्या भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाला थॉमस बॅडमिंटन करंडकातील उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत पराभवाचा धक्का बसला. बलाढ्य चीनच्या पुरुष संघाने भारतीय संघाला ३-१ असे सहज पराभूत केले आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला. उबेर करंडकातही भारतीय महिला संघाला निराशेला सामोरे जावे लागले. जपानने भारतीय महिला संघावर ३-० अशी मात करताना पुढे पाऊल टाकले.

भारत-चीन या दोन देशांमध्ये थॉमस करंडकातील उपांत्यपूर्व फेरीची लढत रंगली. चीनच्या शी यू की याच्यासमोर एच. एस. प्रणोय याचे आव्हान होते. प्रणोय याने पहिला गेम २१-१५ असा जिंकत आघाडी मिळवली, पण पुढील दोन गेममध्ये प्रणोयला प्रतिमेला साजेशी कामगिरी करता आली नाही. शी यू की याने २१-११, २१-१४ अशी बाजी मारत चीनला १-० अशी आघाडी मिळवून दिली.

सात्विक साईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी या भारताच्या स्टार जोडीलाही विजय मिळवता आला नाही. लियांग केंग - वँग चँग या जोडीने सात्विक - चिराग जोडीचा कडवा संघर्ष २१-१५, ११-२१, २१-१२ असा तीन गेममध्ये मोडून काढला. भारतीय जोडीला ५१ मिनिटांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला.

लक्ष्यमुळे आव्हान कायम; पण...

चीनकडून २-० अशा पिछाडीवर असताना लक्ष्य सेन याने भारतासाठी मोलाची कामगिरी बजावली. त्याने परतीच्या एकेरीच्या लढतीत ली शी फेंग याच्यावर १३-२१, २१-८, २१-१४ असा विजय संपादन केला. लक्ष्य याने एक तास व दहा मिनिटांत विजयाला गवसणी घातली. लक्ष्यच्या विजयामुळे भारताचे आव्हान

कायम राखले होते, पण ध्रुव कपिला-साई

प्रतीक या जोडीला ही जी टिंग - रेन यू या जोडीकडून २१-१०, २१-१० अशी हार पत्करावी लागली. त्यामुळे भारताचा खेळ खल्लास झाला.

महिला विभागात निराशा

पी. व्ही. सिंधूच्या अनुपस्थितीत भारतीय महिला संघात युवा खेळाडूंचा समावेश होता. या संघाने उपांत्यपूर्व फेरीत मजल मारून मोठी कामगिरी केली होती, पण उपांत्यपूर्व फेरीचा अडथळा त्यांना ओलांडता आला नाही. अश्‍मिता छलीहा हिला एया ओहोरी हिच्याकडून १०-२१, २२-२०, १५-२१ अशा फरकाने पराभूत व्हावे लागले. प्रिया के. - श्रुती मिश्रा या जोडीला दुहेरीत निराशेचा सामना करावा लागला. नामी मातसुयामा-चिहारू शिदा या जोडीने त्यांना २१-८, २१-९ असे नमवले. स्टार खेळाडू नोझोमी ओकुहारा हिने इशरानी बरुआ हिला २१-१५, २१-१२ असे हरवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe FDA action : बाटलीतील पाणी दुषीत?, तुकाराम मुंढे याची मोठी कारवाई; ८० हजार बॉटल्सचा साठा जप्त

Sunil Tatkare: पुणे पदवीधर’ न मिळणे हे अपयश, राष्ट्रवादीची हक्काची जागा होती :सुनील तटकरे यांची कबुली

Rahul Gandhi : ‘एकाही देशद्रोह्याला सोडणार नाही’, राहुल गांधी यांच्या टार्गेटवर कोण? सोशल मीडिया पोस्टने खळबळ

IND vs WI: अरे भारीच...! बॉल नीट दिसला नाही, तरी ईशान किशनने बाऊंड्रीजवळ घेतला अफालूनत कॅच, Video एकदा पाहाच

Maharashtra Weather : राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा मात्र 'या' चार जिल्ह्यांत पाऊस धोधो कोसळणार; तुमच्या भागात आज कसे असेल हवामान? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT