America Cricket Team eSakal
Cricket

USA vs BAN: अमेरिकेने घडवला इतिहास! बांगलादेशला T20 मालिकेत चारली धूळ; वर्ल्ड कपपूर्वी भारतालाही दिला सावधानतेचा इशारा

USA beat Bangladesh: अमेरिकेने बांगलादेशला टी20 मालिकेत पराभूत करत इतिहास रचला आहे.

Pranali Kodre

USA T20 Series win against Bangladesh: अमेरिका क्रिकेट संघाने शुक्रवारी (24 मे) हस्टन येथे बांगलादेशविरुद्ध टी20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात 6 धावांनी विजय मिळवला. या विजयासह अमेरिकेने 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आणि मालिकेतील विजयही निश्चित केला आहे. अमेरिकेसाठी हा मालिका विजय ऐतिहासिक ठरला.

आयसीसीचे पूर्ण सदस्य असलेल्या देशाच्या संघाविरुद्ध मिळवलेला अमेरिकेचा हा पहिला मालिका विजय ठरला आहे.

या विजयाने अमेरिकेचा आगामी टी20 वर्ल्ड कपपूर्वी आत्मविश्वास वाढला असणार आहे. यंदाच्या टी20 वर्ल्ड कपमध्ये अमेरिकाही सहभागी होणार आहे. विशेष म्हणजे अमेरिका यंदाच्या टी20 वर्ल्ड कपसाठी यजमान देखील आहे.

टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील पहिल्या फेरीसाठी अमेरिकेचा समावेश ग्रुप एमध्ये आहे. या ग्रुपमध्ये अमेरिकेसह भारत, पाकिस्तान, कॅनडा आणि आयर्लंड हे चार संघ देखील आहे. त्यामुळे एकूणच अमेरिका ज्या फॉर्ममध्ये खेळत आहे, ते पाहाता इतर संघांना त्यांना कमी लेखून चालणार नाही.

दरम्यान, दुसऱ्या टी20 सामन्यात अमेरिकेने बांगलादेशसमोर विजयासाठी 145 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ 19.3 षटकात 138 धावांवरच सर्वबाद झाला.

अखेरच्या षटकात बांगलादेशला 12 धावांची गरज होती, तर अमेरिकेला एका विकेटची गरज होती. यावेळी अली खानने रिषाद हुसैनला 9 धावांवर बाद करत अमेरिकेचा विजय निश्चित केला.

बांगलादेशकडून कर्णधार नजमुल हुसैन शांतोने सर्वाधिक 36 धावा केल्या. तसेच शाकिब अल हसनने 30 धावांची खेळी केली. याव्यतिरिक्त कोणालाही 30 पेक्षा अधिक धावा करता आल्या नाहीत.

अमेरिकेकडून अली खानने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या, तसेच सौरभ नत्रावळकर आणि शेडली वॅन शाल्क्विक यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच जसदीप सिंग आणि कोरी अँडरसन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

तत्पुर्वी, अमेरिकेचा संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला होता. अमेरिकेकडून कर्णधार मोनांक पटेलने 42 धावांची खेळी केली. तसेच ऍरॉन जोन्सने 35 आणि स्टीवन टेलरने 31 धावांची खेळी केली.

त्यामुळे अमेरिकेने 20 षटकात 6 बाद 144 धावा केल्या होत्या. बांगलादेशकडून शोरिफूल इस्लाम, मुस्तफिजूर आणि रिषाद हुसैन यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीए परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT