unmukt chand USA T20 World Cup 2024 sakal
Cricket

T20 World Cup 2024 : भारताला वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या कर्णधाराला अमेरिकेने देखील दिला नारळ!

T20 World Cup 2024 : यूएसए आणि वेस्ट इंडिजमध्ये 1 जूनपासून वर्ल्ड कपचा थरार रंगणार आहे. यूएसए संघ यावेळी यजमान म्हणून या स्पर्धेत सहभागी होणार आहे.

Kiran Mahanavar

T20 World Cup 2024 : यूएसए आणि वेस्ट इंडिजमध्ये 1 जूनपासून वर्ल्ड कपचा थरार रंगणार आहे. यूएसए संघ यावेळी यजमान म्हणून या स्पर्धेत सहभागी होणार आहे. त्याआधी त्यांनी विशेष तयारी सुरू केली आहे. या वर्ल्ड कपसाठी यूएसए संघाने अनेक स्टार खेळाडू घेऊन आपला संघ तयार केला आहे. त्यात न्यूझीलंडच्या दिग्गज खेळाडूचाही समावेश आहे, जो जवळपास 6 वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे भारताचा वर्ल्ड कप चॅम्पियन कर्णधार उन्मुक्त चंद याला संधी देण्यात आलेली नाही.

यूएसए संघात कोणाला मिळाले स्थान?

यूएसए संघ वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीसाठी कॅनडाविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळणार आहे. कोरी अँडरसन हे नाव क्रिकेट चाहत्यांनी ऐकले असेलच. या खेळाडूने 2018 मध्ये न्यूझीलंडकडून अखेरचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले होते.

पण 2020 मध्ये अमेरिकेत शिफ्ट झाल्यानंतर आता हा खेळाडू अमेरिकेचा आंतरराष्ट्रीय खेळाडू बनणार आहे. डॅशिंग अष्टपैलू खेळाडूला आगामी टी-20 मालिकेसाठी यूएसए संघात स्थान मिळाले आहे. आणि तो 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची शक्यता आहे.

33 वर्षीय कोरी अँडरसनने अमेरिकेच्या संघात सामील झाल्यापासून 28 डावांत 900 धावा केल्या आहेत. त्याची आकडेवारी मायनर लीग (MILC) ची आहे. कोरी अँडरसन व्यतिरिक्त, भारतीय अंडर-19 संघाचा माजी खेळाडू हरमीत सिंग देखील यूएसए संघाचा भाग बनला आहे. तसेच आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळलेला दिल्लीचा माजी खेळाडू आणि फलंदाज मिलिंद कुमारचाही या संघात समावेश आहे. याशिवाय कॅनडाचा माजी कर्णधार नितीश कुमारही अमेरिकन संघात सामील झाला आहे.

उन्मुक्त चंदला मिळाली नाही संधी

तर बराच काळ अमेरिकेत असलेल्या उन्मुक्त चंदला या संघात स्थान मिळालेले नाही. मायनर लीगच्या तीन मोसमात चमकदार कामगिरी करूनही त्याला स्थान मिळालेले नाही. चंदच्या नावावर 45 डावांमध्ये 1500 हून अधिक धावा आहेत. त्याचा संघात समावेश न होणे हा मोठा धक्का आहे. त्यामुळे वर्ल्ड कप स्पर्धेतही अमेरिकेच्या संघात खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. या संघाचा कर्णधार मोनांक पटेल तर ॲरॉन जोन्स उपकर्णधार असणार आहे.

यूएसए संघ : मोनांक पटेल (कर्णधार), आरोन जोन्स (उप-कर्णधार), कोरी अँडरसन, गजानंद सिंग, जेसी सिंग, सौरभ नेत्रावलकर, निसर्ग पटेल, स्टीव्हन टेलर, अँड्रिस गॉस, हरमीत सिंग, शेडली व्हॅन शाल्कविक, नॉस्तुश केन्झिगे, मिलिंद कुमार. नितीश कुमार, उस्मान रफिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT