Rohit Sharma esakal
Cricket

Video Viral : समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो अन् Rohit Sharma ची मनं जिंकणारी कृती

Rohit Sharma seek blessings chhatrapati shivaji maharaj : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा कर्जत-जामखेड मतदारसंघातील राशीन येथे उभारण्यात येणाऱ्या क्रीडा संकुल व क्रिकेट स्टेडियमचे भूमिपूजन आज केले.

Swadesh Ghanekar

Rohit Sharma in karjat; seek blessings chhatrapati shivaji maharaj : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि आमदार रोहित पवार यांच्या मतदार संघात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याची दमदार एन्ट्री झाली. हॅलिकॉप्टरमधून उतरल्यानंतर ते मंचावर येईपर्यंत रोहितसाठी लाखो चाहते जमले होते. रोहितच्या नावाचा गजर घुमला... निमित्त होतं ते कर्जत-जामखेड मतदारसंघातील राशीन येथे उभारण्यात येणाऱ्या क्रीडा संकुल व क्रिकेट स्टेडियमच्या भूमिपूजनाचे... यावेळी रोहितने त्याच्या एका कृतीने सर्वांची मनं जिंकली...

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आयसीसी स्पर्धेचा ११ वर्षांचा दुष्काळ संपवला. २००७ नंतर भारतीय संघाने प्रथमच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला तो रोहितच्या नेतृत्वाखाली. त्यानंतर नुकत्याच झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाने निर्विवाद वर्चस्व गाजवले आणि बाजी मारली. आता टीम इंडियाचे पुढील लक्ष्य न्यूझीलंड ( घरच्या मैदानावर) आणि ऑस्ट्रेलिया ( दौरा) विरुद्धची कसोटी मालिका. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेच्या तयारीला लागण्यापूर्वी रोहितने आज कर्जत-जामखेड मतदारसंघात उपस्थिती लावली...

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलच्या दृष्टीने भारताला आगामी कसोटी मालिकेत चांगली कामगिरी करणे गरजेचे आहे. भारतीय संघ WTC Standing मध्ये अव्वल स्थानावर आहे, परंतु फायनलमधील त्यांचे स्थान अजूनही पक्कं झालेलं नाही. त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपदही भारताला खुणावत आहे आणि रोहितच्या नेतृत्वाखालीच टीम इंडिया खेळेल, अशी घोषणा बीसीसीआय सचिव जय शाह यांनी आधीच केली आहे.

आज रोहितला पाहण्यासाठी राशीन येथे मोठी गर्दी उसळली होती. रोहित म्हणाला, वर्ल्ड कप जिंकणं हे आमचं लक्ष्य होतं आणि ते आम्ही पूर्ण केलं... माझ्या जीवात जीव आला... कर्जतमध्ये आम्ही क्रिकेट अकादमी सुरू करत आहोत आणि मला खात्री आहे की इथून पुढील गिल, जैस्वाल, बुमराह येतील, ही मी तुम्हाला खात्री देतो.

दरम्यान, भूमिपूजन करण्यापूर्वी रोहितने छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासह अनेक महापुरूषांना नमन केले. त्याआधी रोहितने त्याची बूट काढून ठेवली आणि हे पाहून चाहत्यांची मनं जिंकली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Changur Baba : अंगठ्या अन् रत्न विकायचा, ५ वर्षात जमवली १०० कोटींची माया; धर्मांतर रॅकेट प्रकरणी अटक केलेला छांगुर बाबा कोण?

बौद्ध धर्मगुरू दलाई लामांना 'भारतरत्न' देण्याची मागणी; 80 खासदारांनी केली पाठिंबा दर्शवणारी स्वाक्षरी, मोदी सरकार घेणार लवकरच निर्णय?

Guru Purnima 2025 Greeting Card: गुरुपौर्णिमेनिमित्त गुरूंसाठी बनवा खास ग्रीटिंग कार्ड, जाणून घ्या सोपी पद्धत

Oxford Graduate: ऑक्सफर्ड विद्यापीठाचा पदवीधर करतोय फूड डिलिव्हरी; दरमहा कमावतोय लाखो रुपये, म्हणाला...

Solapur Crime: निर्दयी मुलाने बापाला चाबकाचे फटके देऊन संपविले, घरात रक्ताचा पाट वाहिला तरी...सोलापूर हादरले !

SCROLL FOR NEXT