Rohit Sharma Sakal
Cricket

Rohit Sharma: सात की आठ बॅग? पुन्हा दिसला रोहितचा विसरभोळेपणा, Video होतोय व्हायरल

Rohit Sharma Viral Video: रोहित शर्मा ट्रीपवरून परत आल्यानंतर त्याच्या किती बॅग्स होत्या हेच विसरला, त्याचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.

Pranali Kodre

Rohit Sharma viral video: भारताचा वनडे आणि कसोटी कर्णधार रोहित शर्माचा विसरभोळा स्वभाव आता अनेकांना माहित झाला आहे. अनेक खेळाडूंनाही त्याच्या या विसरभोळेपणाबाबत अनेकदा गमतीशीर किस्से सांगितले आहेत. आता पुन्हा एकदा त्याचा हा विसरभोळेपणा समोर आला आहे.

रोहित शर्मा नुकताच आपली पत्नी रितिकी आणि मुलगी समायरा यांच्यासह एका मोठ्या सहलीवरून परत आला. यावेळी त्याला त्याच्याबरोबर किती बॅग होत्या, यात गोंधळ झालेला दिसला.

एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसते रोहित कारच्या ड्रायव्गिंग सिटवर बसला आहे, त्याच्या शेजारी रितिका आणि समायरा आहे. तो आधी कोणालातरी सात बॅग असल्याचं सांगतो, पण नंतर परत सांगतो की आठ बॅग असायला हव्यात.

यानंतर तो स्वत: कार चालवत निघून जातो. त्याच्या या व्हिडिओवर युजर्सच्या अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. अनेकांनी म्हटलं आहे की नेहमीप्रमाणे आता रोहित बॅगची संख्या विसरलाय.

दरम्यान, रोहित सहलीवरून परत आल्यानंतर त्याचा डोंबिवलीमध्ये टी२० वर्ल्ड कप विजयाच्या निमित्ताने सत्कार करण्यात आला. यावेळी त्याचे आई-बाबाही उपस्थित होते. या घटनेचा व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे.

रोहितच्या नेतृत्वाखाली जून २०२४ च्या अखेरीस भारतीय संघाने टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धा जिंकली. या स्पर्धेनंतर रोहितने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यामुळे त्याला साधारण १ महिन्यांचा ब्रेक मिळाला होता.

या ब्रेकमध्ये तो कुटुंबासह सहलीसाठी गेला होता. आता तो या सहलीवरून परतला असून लवकरच श्रीलंका दौऱ्यासाठी रवाना होईल. सध्या भारताचा टी२० संघ श्रीलंका दौऱ्यावर आहे. टी२० मालिका ३० जुलैला संपणार आहे.

त्यानंतर २ ऑगस्टपासून वनडे मालिकेला सुरुवात होईल. वनडे मालिकेतून रोहितसह विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल भारतीय संघात पुनरागमन करणार आहेत. रोहित श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्वही करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maruti Cars: जीएसटी कमी झाल्यानंतर अल्टो, स्विफ्ट, डिझायर आणि वॅगनआरची किंमत किती असेल?

Prithvi Shaw : IPL 2026 मध्ये पृथ्वी शॉ CSK च्या ताफ्यात? ऋतुराज गायकवाडची मध्यस्थी? फ्रँचायझीने पोस्ट केला Video

न्यायालये ताकदवान नाहीत, हात बांधलेत असं आम्ही म्हणू का? सरन्यायाधीशांचा सरकारला सवाल

Diabetes in Kids: तुमच्या मुलांना डायबिटीजचा धोका आहे का? 'ही' ८ लक्षणे वेळेत ओळखून घ्या योग्य काळजी

Shivaji Maharaj: पुण्यातील मानाचा पहिला गणपती अन् शिवरायांचं बंधन! ; मावळे मोहिमेवर जाण्याआधी घेत असत बाप्पाचं दर्शन

SCROLL FOR NEXT