Team India Sakal
Cricket

T20 World Cup 2024: केएल राहुल, सिराजला संधी नाही! वेस्ट इंडिजच्या दिग्गजाने निवडली टीम इंडिया, पाहा कोणाला दिली संधी

Brian Lara's Team India: वेस्ट इंडिजचा दिग्गजाने आगामी टी20 वर्ल्डकपसाठी संभाव्य भारतीय संघ जाहीर केला आहे.

Pranali Kodre

Team India Squad T20 WC24: जून 2024 मध्ये टी20 वर्ल्डकप खेळवला जाणार आहे. हा वर्ल्डकप वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणार आहे. या वर्ल्डकपसाठी आता जवळपास सर्वच सहभागी देश संघबांधणीचा विचार करताना दिसत आहेत.

याचदम्यान गेल्या काही दिवसात अनेक माजी क्रिकेटपटूंनी भारतीय संघात कोणत्या खेळाडूंना जागा मिळू शकते, याबाबत अंदाज व्यक्त केले आहेत. यात आता ब्रायन लाराचाही समावेश झाला असून त्यानेही त्याचा भारतीय संघ जाहीर केला आहे.

ब्रायन लाराने स्टार स्पोर्ट्सशी बोलताना जाहीर केलेल्या भारतीय संघात त्याने विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना संधी दिली असून युवा खेळाडूंचेही मिश्रण या संघात ठेवले आहे. मात्र त्याने या संघात केएल राहुल आणि मोहम्मद सिराज यांना संधी दिलेली नाही.

त्याने वेगवान गोलंदाजीत संदीप शर्मा आणि मयंक यादव यांना निवडले आहे. या दोघांनीही आयपीएल 2024 मध्ये आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. मयंक यंदाच्या हंगामात सर्वात वेगवान चेंडू टाकणारा गोलंदाज आहे.

याशिवाय लाराने त्याच्या संघात यष्टीरक्षक म्हणून ऋषभ पंतला पहिली पसंती दिली असून संजू सॅमसनलाही बॅकअप म्हणून निवडले आहे.

याशिवाय रोहितबरोबर सलामीला यशस्वी जैस्वालला त्याने संधी दिली आहे, तर सूर्यकुमार यादवचीही निवड केली आहे. अष्टपैलू खेळाडूंमध्ये त्याने हार्दिक पांड्या, शिवम दुबे आणि रविंद्र जडेजा यांना संधी दिली आहे, तर फिरकीपटू म्हणून कुलदीप यादवसह युजवेंद्र चहलला निवडले आहे.

ब्रायन लाराचा टी20 वर्ल्डकपसाठी संभाव्य भारतीय संघ -

  • रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा,शिवम दुबे, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, संदीप शर्मा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, मयंक यादव.

बीसीसीआय कधी करणार भारतीय संघाची घोषणा

रविवारी (28 एप्रिल) भारतीय संघाबद्दल कर्णधार रोहित शर्माची आणि निवड समीती अध्यक्ष अजित अगरकर यांची दिल्लीमध्ये बैठक झाली आहे. त्यामुळे 1 मे पूर्वी भारतीय संघाची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: भारतीय संघ सेमीफायनलमध्ये! न्यूझीलंडचे पराभवासह आव्हान संपलं; स्मृती मानधना-प्रतिका रावल विजयाच्या नायिका

Raireśhwar Fort Incident VIDEO : रायरेश्वर किल्ला परिसरात दारू पार्टी करणाऱ्या परप्रांतीय तरूणांना शिवप्रेमींकडून चोप!

Ambulance Fire : मध्यरात्री लातूरकडे जाताना ॲम्बुलन्स जळून खाक! डॉक्टरांनी दाखवले प्रसंगावधान, महिलेचा जीव वाचला

Lonar News : समृद्धी महामार्गावर मोठी कारवाई! संशयास्पद कंटेनर चालकाजवळ आढळले देशी पिस्तूल व जिवंत काडतुसे

PM Kisan Yojana News: पीएम किसान योजनेच्या २१ व्या हप्त्याबाबत नवीन अपडेट; जाणून घ्या, २००० रुपये कधी येणार?

SCROLL FOR NEXT