WPL Harmanpreet Kaur esakal
Cricket

WPL Harmanpreet Kaur : खुद्द कर्णधार हरमनप्रीतच म्हणते गतविजेत्या मुंबई इंडियन्समोर यंदा मोठं आव्हान

WPL 2024 Harmanpreet Kaur : हरमनप्रीत कौरला चिन्नास्वामी अन् दिल्लीचं टेन्शन

अनिरुद्ध संकपाळ

WPL 2024 Harmanpreet Kaur Mumbai Indians : मुंबई, ता. 16 - वेगवेगळ्या परिस्थितीशी मिळतेजुळते घेणे महिला प्रीमियर लीगचे विजेतेपद राखताना महत्त्वाचे ठरणार आहे, असे मत मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौरने व्यक्त केले. यंदाची स्पर्धा २३ फेब्रुवारी ते १७ मार्चदरम्यान होत असून दिल्ली आणि बंगळूर येथेच सामने होणार आहेत.

पहिल्यावहिल्या महिला प्रीमियर लीगमध्ये गतवर्षी मुंबई इंडियन्सने विजेतेपद मिळवले होते. मुंबईचा संघ अजून ताकदवर झाल्यामुळे यंदाही त्यांचा दबदबा राहण्याची शक्यता आहे.

बंगळूरमधीच्या चिन्नास्वामी स्टेडियमची खेळपट्टी मुंबईपेक्षा वेगळी आहे; तसेच हवामानातही फरक आहे. दिल्लीत खेळण्याचा मला फारसा अनुभव नाही. त्यामुळे आम्हाला तेथील परिस्थितीशी मिळतेजुळते घ्यावे लागेल, असे हरमनप्रीत आज झालेल्या पत्रकार परिषदेत म्हणाली.

गतविजेते असल्यामुळे आम्हाला या वेळी फार काही वेगळे करण्याची गरज नाही. गतवर्षी केलेला सकारात्मक विचार आणि खेळ करण्याबरोबर आम्ही दडपणरहित मानसिकता बाळगणार आहोत, असे हरमनप्रीत म्हणाली.

आम्ही एकमेकांच्या यशात सहभागी होतो आणि एकमेकांना सांभाळून घेतो, ही मुंबई इंडियन्स संघाची संस्कृती आहे, असे हरमनप्रीतने आवर्जून सांगितले.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

US H1B Visa: अमेरिकेचा H1B झटका! १ लाख ३ हजार डॉलर अतिरिक्त शुल्कामुळे नोकऱ्या परदेशात जाण्याची भीती

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Birth Death Registration Rules : जन्म-मृत्यू नोंदीला दोन वर्षे विलंब, तर न्यायालयाचे दार ठोठावे लागणार; केंद्राचे नवे कडक नियम लागू, गैरप्रकार रोखण्यासाठी पाऊल

SCROLL FOR NEXT