India Women Team X/BCCIWomen
Cricket

Women's Asia Cup 2024: भारताविरूद्ध पाकिस्तानने जिंकला टॉस! हरमनप्रीतने सांगितलं प्लेइंग-11 मध्ये झाले तीन बदल

India vs Pakistan Playing XI: महिला आशिया कप स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग-११ मध्ये तीन बदल करण्यात आले आहे.

Pranali Kodre

Women's Asia Cup 2024 India vs Pakistan Playing XI: महिला आशिया कप २०२४ स्पर्धेला शुक्रवारपासून (१९ जुलै) सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान महिला संघ एकमेकांविरुद्ध खेळत मोहिमेला सुरुवात करणार आहे.

डंबुला येथे होणाऱ्या या सामन्यात पाकिस्तानची कर्णधार निदा दार हिने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तिने नाणेफेक जिंकल्यानंतर सांगितले की आमच्या संघात फलंदाजी आणि गोलंदाजीचा चांगला समतोल साधलेला आहे.

तसेच या सामन्यासाठी भारतीय संघात तीन मोठे बदल झाल्याचे कर्णधार हरमनप्रीत कौरने सांगितले आहे. भारताने या स्पर्धेपूर्वी मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी२० मालिका खेळली होती. या मालिकेतील अखेरच्या टी२० सामन्यातील प्लेइंग इलेव्हनमधील आणि आत्ताच्या प्लेइंग इलेव्हनध्ये तीन बदल असल्याचे हरमनप्रीतने स्पष्ट केले.

तिने सांगितले की रेणुका सिंग ठाकूर, दयालन हेमलता यांचे पुनरागमन झाले आहे. याशिवाय ऋचा घोष हिचेही दुखापतीनंतर पुनरागमन झाले आहे.

दरम्यान, भारतीय संघ या स्पर्धेतील गतविजेता आहे. त्यामुळे भारतीय संघ ही ट्रॉफी राखण्याचा प्रयत्न करेल, तर पाकिस्तान पहिल्यांदाच ही स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न करताना दिसेल.

असे आहेत प्लेइंग इलेव्हन

भारतीय महिला संघ: स्मृती मानधना, शफाली वर्मा, दयालन हेमलता, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), ऋचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, श्रेयंका पाटील, रेणुका ठाकूर सिंग.

पाकिस्तान महिला संघ: सिद्रा अमीन, गुल फिरोजा, मुनीबा अली (यष्टीरक्षक), निदा दार (कर्णधार), आलिया रियाझ, इरम जावेद, फातिमा सना, तुबा हसन, सादिया इक्बाल, नशरा संधू, सय्यदा आरूब शाह

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबई सुरक्षेत चौथ्‍या स्‍थानावर! ‘राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण’चा अहवाल; सर्वाधिक गुन्हेगारी कोणत्या शहरात?

मुसळधार पावसाचा हाहाकार! पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू, भूस्खलनामुळे रस्ते बंद

Kolhapur News : देवीची मूर्ती मंडपात; साउंडची ईर्ष्या चौकात, पोलिसांनी काठ्यांनी मारलं तरीही बारा तासांहून अधिक काळ मंडळांनी अडवले रस्ते

Latest Marathi News Live Update: अमित शाह लोणीमध्ये दाखल

Kolhapur Tragedy : क्लासमध्ये ओळख, मैत्रिणीला कोल्हापुरातून उचललं; पंढरपुरात ४ दिवस कोंडलं, कोकणात नेलं पण तिथून पळून गेली अन्...

SCROLL FOR NEXT