India Women Cricket Team X/BCCIWomen
Cricket

Women's Asia Cup 2024: भारताची विजयी सुरुवात! पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला केलं चारीमुंड्या चीत

India vs Pakistan Women: महिला आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तानचा दारुण पराभव केला आणि स्पर्धेची विजयी सुरुवात केली आहे.

Pranali Kodre

Women's Asia Cup 2024, India vs Pakistan: महिला आशिया कप 2024 स्पर्धेतील दुसरा सामना शुक्रवारी (19 जुलै) भारत विरुद्ध पाकिस्तान संघात होत आहे. डंबुला येथे होत असलेल्या या सामन्यात भारतीय संघाने 7 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला.

या स्पर्धेतील हा दोन्ही संघांचा पहिला सामना होता. त्यामुळे भारताने या स्पर्धेतील मोहिमेची सुरुवात विजयाने केली, तर पाकिस्तानची सुरुवात पराभवाने झाली आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की भारतीय महिला संघाचा हा आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील 100 वा विजय ठरला.

या सामन्यात पाकिस्तानने भारतासमोर 109 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग भारतीय संघाने 14.1 षटकात 3 विकेट्स गमावत सहज पूर्ण केला.

या सामन्यात भारताकडून सलामीला आलेल्या शफली वर्मा आणि स्मृती मानधना यांनी चांगली सुरुवात केली. काही चांगले आक्रमक शॉट्सही या दोघींनी खेळत सलामीला 85 धावांची भागीदारी रचली. मात्र, दोघींचेही अर्धशतक थोडक्यात हुकले. 10 व्या षटकात मानधनाला सईदा अरुब शाहने बाद केले.

स्मृतीने 31 चेंडूत 45 धावा केल्या. तसेच 12 व्या षटकात शफलीला सईदाने 40 धावांवर त्रिफळाचीत केले. पण तोपर्यंत भारतीय संघ विजयाच्या जवळ पोहचला होता.

मात्र, यादरम्यान 13 व्या षटकात दयालन हेमलता 14 धावांवर बाद झाली. पण अखेरीस भारताच्या विजयाची औपचारिकता कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमिमाह रोड्रिग्सने पूर्ण केली. हरमनप्रीत 5 धावांवर आणि जेमिमाह 3 धावांवर नाबाद राहिल्या.

पाकिस्तानकडून सईदाने 2 विकेट्स, तर नशरा संधूने 1 विकेट घेतली.

तत्पुर्वी, पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पाकिस्तानचा संघ 19.2 षटकात 108 धावांवर सर्वबाद झाला. पाकिस्तानकडून सिद्रा अमीनने सर्वाधिक 25 धावा केल्या.

तिच्याव्यतिरिक्त केवळ तौबा हसन आणि फातिमा सना या दोघींनाच 20 धावांचा टप्पा पार करता आला. या दोघींनीही प्रत्येकी 22 धावा केल्या. तसेच मुनीबा अलीने 11 धावा केल्या.

भारताकडून गोलंदाजी करताना दिप्ती शर्माने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच पुजा वस्त्राकर, रेणुका सिंग ठाकुर आणि श्रेयंका पाटील यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT