Womens Premier League DRS Controversy rcb vs upw Aakash Chopra Marathi News sakal
Cricket

DRS Controversy : गुगली की लेग स्पिन... WPL मध्येही DRS गंडला, माजी क्रिकेटपटू जाम भडकला

लीगच्या अकराव्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने यूपी वॉरियर्सचा 23 धावांनी पराभव केला. मात्र, या सामन्यादरम्यान असे काही घडले ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Kiran Mahanavar

Womens Premier League DRS Controversy : महिला प्रीमियर लीग 2024 मध्ये एका पेक्षा एक अप्रतिम सामने खेळल्या जात आहे. पण लीगचा अकरावा सामना वादात सापडला आहे. हा वाद इतर कोणत्याही कारणाने नसून डिसिजन रिव्ह्यू सिस्टीममुळे (DRS) झाला आहे.

लीगच्या अकराव्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने यूपी वॉरियर्सचा 23 धावांनी पराभव केला. मात्र, या सामन्यादरम्यान असे काही घडले ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने 20 षटकांत तीन गडी गमावून 198 धावा केल्या. कर्णधार स्मृती मानधना हिने 50 चेंडूत 80 तर एलिस पेरीने 37 चेंडूत 58 धावा केल्या.

199 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या यूपी संघाला पाचव्या षटकात पहिला धक्का बसला. जेव्हा किरण नवगिरे 18 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. यानंतर फलंदाजीला आलेल्या चमारी अटापट्टूला डावाच्या सातव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर वादग्रस्तपणे लेग बिफोर आऊट देण्यात आले. या विकेटनंतर डीआरएसवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जॉर्जिया वेअरहॅम यूपीच्या डावातील सातवे षटक टाकत होती. त्याच्या चेंडूवर स्वीप शॉट मारण्याचा प्रयत्न करत असताना अटापट्टूकडून चेंडू हूकला आणि पॅडला लागला. यानंतर आरसीबीच्या खेळाडूंनी जोरदार अपील केली, पण मैदानावरील पंचांनी तिला नॉट आऊट दिले.

यानंतर आरसीबीची कर्णधार स्मृती मंधानाने डीआरएसचा वापर केला. बॉल ट्रॅकिंगमध्ये असे दिसून आले की चेंडू बॅटला लागला नाही, त्यानंतर एलबीडब्ल्यू तपासण्यात आला. मूळ व्हिडीओ पाहून असे वाटले की चेंडू फिरून डावीकडे जाईल आणि स्टंपला लागणार नाही, पण हॉक आयने तो गुगलीप्रमाणे दुसरीकडे वळताना दाखवला. आणि तो थेट स्टंपला जाणून लागला.

डीआरएसमध्ये वेरहॅमचा लेगस्पिन चेंडू स्टंपच्या मध्यभागी लागताना दिसला. यानंतर मैदानावरील पंचांना आपला निर्णय बदलून आऊट द्यावा लागला. हे पाहून अटापट्टूसह फलंदाजी करत असलेली संघाची कर्णधार ॲलिसा हिलीही हैराण झाली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा रिव्ह्यू पाहून तिथे उपस्थित असलेले चाहते आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमलाही आश्चर्याचा धक्का बसला.

भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रानेही याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्याने डीआरएसबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. आकाशने सोशल मीडियावर लिहिले की, हा एक लेग स्पिन बॉल होता. चेंडू पायाच्या अगदी जवळ पिच झाला. हॉक आयच्या मते, चेंडू सरळ किंवा गुगली आहे जो स्टंपच्या मध्यभागी लागत आहे. हॉक आय याविषयी काय म्हणतो ते पाहण्यासाठी मी वाट पाहत आहे. जेव्हा चेंडू खेळपट्टीवर येतो आणि पॅडच्या जवळ आदळतो तेव्हा अधिक चुका होतात का? लक्षात ठेवा, जो रूट ज्या चेंडूवर एलबीडब्ल्यू आऊट झाला तोही हाफ व्हॉली होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : "नाशिकला संधी दिली आता मुंबईत संधी द्या" - अमित ठाकरे

Education Department : शिक्षक पुरस्काराबाबत उदासीनता; १० तालुक्यांतून केवळ दोन-दोनच प्रस्ताव

Crime News : ‘मुलबाळ होत नाही’ म्हणून विवाहितेचा छळ; धारदार हत्याराने वार करून जीवे ठार मारल्याचा आरोप

'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’च्या शूटिंगला सुरुवात ! आदिती तटकरे यांच्या हस्ते मुहूर्त सोहळा संपन्न

SCROLL FOR NEXT